Agriculture News । यंदा पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. ऐन पावसाळयाच्या दिवसात (Rain in Maharashtra) पावसाने राज्याच्या अनेक भागात पाठ फिरवली. त्यामुळे पिके जळून गेली. त्यात रब्बी हंगामात राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले. अशातच आता राज्यात दुष्काळसदृश (Drought in Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशावेळी राज्यात पाण्याची टंचाई जाणवू शकते. पण यावर तुम्ही मात मिळवू शकता. यासाठी तुम्हाला एका तंत्राचा वापर करावा लागेल. आच्छादनामुळे पाण्याची कमतरता किंवा दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही प्रमाणात कमी होण्यास आणि पिक वाढीस तसेच पर्यायाने उत्पादन वाढविण्यास त्याची खूप मदत होते.
उदाहरणार्थ समजा तुम्ही संत्रा, डाळींब किंवा अन्य पिकांना १२-१५ दिवसांच्या अंतराने पाणी देत असाल तर आच्छादनामुळे सिंचनाचा कालावधी २०-२५ दिवसांपर्यत वाढविता येते. असे केल्याने पाण्याची बचत होते. आच्छादनाचे इतर फायदे जाणून घेऊयात सविस्तरपणे.
जाणून घ्या फायदे
- बीज उगवण क्षमतेत वाढ होते.
- शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते.
- तणांची वाढ लक्षणीयरीत्या रोखली जाते.
- आंतर मशागतीचे कामे कमी होऊन खर्चात बचत होते.
- मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.
- आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त असते.
- पीक काढणीस लवकर तयार होते.
- पिकाच्या उत्पादकतेत २५% पर्यंत वाढ होते.
- पावसाळ्यात पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
E-Peak Inspection । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य
आच्छादनाच्या पद्धती
सेंद्रिय आच्छादन (Organic mulch)
उसाचा पाचट, साल, भाताचा पेंढा, गव्हाचा पेंढा, कोरडी पाने, कोरडे गवत, लाकूड चिप्स, भूसा, गवत इत्यादी नैसर्गिक पदार्थांपासून सेंद्रिय आच्छादन बनलेला असतो. ही सेंद्रिय आच्छादन सामग्री सहजपणे विघटित होऊन पावसाळ्यात टाकलेले आच्छादन बुडक्या पासून दूर करावे. सेंद्रिय आच्छादन सतत बदलण्याची आवश्यकता असून कीटक, स्लग आणि कटवर्त्सना आकर्षित करते.
Sugarcane FRP । एफआरपी कितीही वाढवला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
पेंढा आच्छादन (Straw mulch)
हे सर्वात सामान्य वापरले जाणारे आच्छादन आहे. भाजीपाला पिके, फल पिकांसाठी भात, गव्हाचा पेंढा ही सहज मिळणारी आच्छादन सामग्री असून तांदूळ आणि गव्हाचा पेंढा कुजल्यानंतर माती जास्त सुपीक बनते.
गवताचे आच्छादन
ही सर्वात सहज उपलब्ध आच्छादनापैकी एक असून हिरवे गवत किंवा कोरडे गवत, गवत आच्छादनासाठी वापरण्यात येते. कुजल्यानंतर गवत जमिनीला नायट्रोजन पुरवते. पावसाळ्यात, हिरवे गवत तेथेच रूजते.
Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन
भाताचा पेंढा
भाताच्या पेंढ्याचा आच्छादन हे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास तण नियंत्रण आणि जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी खूप मदत करते.
कंपोस्ट
कंपोस्ट पालापाचोळा जमिनीची सुपीकता आणि ओलावा टिकवून ठेवते. हे तणांचे प्रादुर्भाव कमी करत असून हे विघटित सेंद्रिय पदार्थांपासून बनविलेले असते.