Soil testing । कमीत कमी तीन ते चार वर्षांतून एकदा शेतातील मातीचे परीक्षण करायला हवे. परंतु, वर्षानुवर्षे शेतात तीच ती पिक घेतली तर प्रत्येक वर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते. सध्या जमिनीचा कस कमी झाला आहे. कारण हल्ली मोठ्या प्रमाणात पिकांसाठी सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) वापर न करता रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजे.
Lemon Market । शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण! लिंबांचे वाढले भाव, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर
आता कृषी विभाग कर्बचे प्रमाण वाढविण्यावर भर देत आहे. पोस्ट ऑफिस (Post Office) कृषी विभागाच्या मदतीला धावून आले आहे. ‘मातीचे परीक्षण केल्यानंतर सात दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल (Soil testing report) येईल,’ अशी महत्त्वाची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
“राज्यात दिवसेंदिवस शेती पिकण्यासाठी आवश्यक असणारे कर्ब कमी होत चालले आहे. समजा हे असेच चित्र राहिले तर जमिनी उपजावू राहणार नाही. आता कृषी विभागाने कर्ब वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मातीची कोणत्या पिकासाठी योग्यता आहे? कोणत्या पिकासाठी नाही? कोणत्या पिकामुळे मातीचे कर्ब वाढू शकते. या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील,” अशी माहिती मुंडे यांनी दिली आहे.
Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर
लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
- वेगवेगळी खते किंवा कचरा टाकण्याच्या जागेचा नमुना घेऊ नये.
- पाण्याच्या स्त्रोताजवळील नमुना घेणे टाळावे.
- ज्या ठिकाणी जनावरे नेहमी बसतात अशा जागेवरील नमुना घेऊ नये.
- तसेच बांध्यावरील किंवा झाडाखालील जागेवरील नमुना घेऊ नये.
Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा