देशातील विविध मोठ्या कंपन्यांमध्ये भराभर नोकरदारांची कपात केली जात आहे. यामुळे बरेच लोक शाश्वत आर्थिक पर्यायाच्या शोधात शेतीकडे वळत आहेत. शेतीमध्ये देखील पारंपरिक पिके घेण्याऐवजी बाजारात जास्त मागणी असणाऱ्या आधुनिक पिकांची (Advance Crops) लागवड शेतकरी करत आहेत. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा होतोय. त्यातल्या त्यात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांचा जास्त भर आहे. ‘गवती चहा’ हे यातलेच एक पीक आहे.
Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार
वीस हजार रुपयांमध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु तुम्ही फक्त 20 हजार खर्च करून गवती चहाच्या म्हणजेच लेमन ग्रासच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता. परंतु, यासाठी शेतीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. (Agriculture Management) एकेकाळी भारत गवती चहाच्या लागवडीमध्ये प्रचंड मागे होता. परंतु सध्या भारताने यामध्ये मोठी प्रगती केली आहे. जगात गवती चहा निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांच्या यादीत आता भारताचे देखील नाव आहे.
Rabbi Crops | अशाप्रकारे मेथीची लागवड करा आणि मिळवा दुप्पट नफा!
एक हेक्टर जमिनीवर गवती चहाची लागवड करून चार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवता येते. एक हेक्टर क्षेत्रातून सुरुवातीला 12 ते 13 टन गवती चहाचे उत्पादन मिळवता येते. त्यानंतरच्या कापणीमध्ये सुमारे पाचपट जास्त उत्पन्न म्हणजेच 60 ते 65 टन उत्पन्न मिळते. दरम्यान एक टन गवती चहापासून सुमारे पाच लिटर तेल निघते.
अशाप्रकारे गवती चहापासून एका वर्षात सुमारे 300 ते 325 लिटर तेल मिळते. बाजारात या तेलाचा दर प्रतिलिटर 1200 ते 1500 रुपये आहे. या स्थितीत चार ते पाच लाख रुपयांची कमाई करणे अगदी सोप्पे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पिकाला जास्त पाण्याची गरज लागत नाही तसेच कीड लागण्याचे प्रमाण देखील कमी असते. (Profitable Farming Option)
Ahmednagar News । अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दिड एकर ऊस आगीत खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर