Lemon Market । जर तुम्ही लिंबाला (Lemon) रोजच्या आहारात समावेश केला तर रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. उलटी, अपचन यांसारख्या पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून एक कप सरबत प्यायल्यास आराम मिळू शकतो. केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातदेखील लिंबाचे सेवन केले तर त्याचा शरीराला खूप फायदा होतो. यावर्षी लिंबाला पावसाचा फटका बसला असल्याने त्याचे दर वाढले आहेत. (Lemon Rate Today)
लिंबाला सध्या नागपूरच्या कळमना बाजारात ३५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळत आहे. हे दर (Lemon Rate) आणखी वाढू शकतात. कारण येत्या काही दिवसात लिंबाची मागणी वाढेल. दरम्यान, दिल्लीमध्ये लिंबाचा ५००० ते ७००० रुपये क्विंटल दर आहे. तर कळमना बाजारात लिंबाची आवक १५ ते २० क्विंटल इतकी आहे. त्यामुळे दर वाढलेले (Lemon Price Hike) पाहायला मिळत आहे. तसेच अमरावतीच्या फळ व भाजीपाला बाजार समितीत लिंबाची आवक १० क्विंटल राहिली.
Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर
या ठिकाणी लिंबाचे दर १८०० ते २००० रुपये आहेत. समजा येत्या काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढली तर हे दर वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च ते जून या हंगामातील फळांना सर्वात जास्त दर मिळतो. कारण या हंगामातील फळांची उपलब्धता उन्हाळ्याच्या दिवसात होत असते. हा दर सरासरी १० हजार रुपये क्विंटलपर्यंत राहतो.
Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा