Animal Fodder

Animal Fodder । जनावरांना गव्हाचे काड चारा म्हणून वापरणे योग्य की अयोग्य?; वाचा माहिती

पशुसंवर्धन

Animal Fodder । शेतकऱ्यांसाठी फक्त शेतीच नाही तर पशुपालन (animal husbandry) हे कमाईचे उत्तम साधन आहे. याद्वारे शेतकरी कमी वेळेत अधिकाधिक कमाई करू शकतात. अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती देखील दूध व्यवसायामुळे सुधारली आहे. परंतु प्राण्यांपासून चांगले फायदे मिळवण्यासाठी त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे की प्राण्यांचे पौष्टिक अन्न आणि त्यांची राहण्याची जागा इ. शेतकरी त्यांच्या जनावरांना विविध प्रकारचे अन्न देतात.

Garlic Price । लसूण अचानक इतका महाग का झाला? समोर आले मोठे कारण

बरेच शेतकरी हे आपल्यला जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा देतात. यामध्ये गव्हाच्या काडाचा देखील काही शेतकरी समावेश करतात. तर काही शेतकरी जनावरांना गव्हाचे काड खाण्यास देत नाहीत. मात्र जनावरांना गव्हाचे काड खाण्यास देणे योग्य की अयोग्य हे तुम्हाला माहिती आहे का? चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती.

Havaman Andaj । मोठी बातमी! देशातील अनेक राज्यांवर अवकाळी पावसाचं संकट; वाचा महाराष्ट्रातील हवामान स्थिती

उत्तर भारतात, म्हणजे पंजाब, हरियाणामध्ये गव्हाचे काड हा दूध व्यवसायाचा कणा आहे. याचा वापर अवश्य केला पाहिजे. महाराष्ट्रात काड हे निष्कृष्ट दर्जाचे खाद्य समजले जाते व ते जाळले जाते दुर्दैवाने असा गैरसमज आहे की, ते खाल्ल्यामुळे जनावरांना घशात कुसळ होते. या खाद्याला स्वतःचे पोषणमूल्य फार जास्त नाही, पण युरिया प्रक्रियेने ते चांगले वाढविता येते. काड देणे परवडणारे असल्यामुळे भरीचा आहार म्हणून जरूर द्यावयास हवे. यामुळे जनावरे पाणी देखील जास्त पितात आणि दूध उत्पादनात वाढ होते.

Onion Damage । कांदे सडण्यापासून वाचवायचे आहेत? हे 5 घरगुती उपाय लगेच करून पहा; होईल फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *