Milk Rate । मागच्या काही दिवसापासून दूध दरवाढीचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये दीड रुपयांची वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर गाईच्या दूध खरेदीरात मात्र दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. याबाबत माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली आहे. (Kolhapur District Co-operative Milk Producers’ Unions)
Viral Video । ऐकावं ते नवलच! संपूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवस साजरा केला मोठ्या जल्लोषात
माहितीनुसार, म्हशीच्या दुधास ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर एक रुपया वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर ६.५ फॅट व ९.० एसएनएफ प्रतीच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे वाढ करण्यात आली आहे.
म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली असली तरी दूध उत्पादकांच्या गायीच्या दूध खरेदीदरात २ रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्यात खासगी व इतर दूध संघांचे गायीच्या दुधाचे खरेदी दर देखील कमी झाले आहेत.