Milk production । दूध (Milk) आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. डॉक्टर देखील रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अनेकजण त्याचा आहारात (Milk for health) समावेश करतात. दुधात कॅल्शियम, मिनरल्स यांसारखे आरोग्यदायी घटक असतात (Benefits of Milk) दुधाची सर्वात जास्त मागणी होते. दूध उत्पादनात काही देश अग्रेसर आहे. तेथे सर्वात जास्त दुधाचे उत्पादन घेतले जाते.
Desi Ber । गावरान बोरांनी गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल मिळतोय १००० ते २००० रुपयांचा दर
अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा व्यवसाय जास्त नफा मिळवून देतात. त्यामुळे अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय करतात. इतकेच नाही तर सरकार देखील या व्यवसायांत मदत करते. जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांची निवड केली तर या व्यवसायांत त्याचा खूप फायदा होतो. लाखो रुपयांची कमाई पशुपालन या व्यवसायातून करता येते.
दूध उत्पादनात अग्रेसर देश
जर तुम्हाला जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणार्या देशांची नावे (Milk production country) माहिती नसतील तर बातमी तुमच्या कामाची आहे. हे लक्षात घ्या की दुग्ध उत्पादनात ब्राझील पाचव्या क्रमांकावर आहे. येथे वर्षाला 3.55 कोटी टन दुधाचे उत्पादन होते. यानंतर भारताचा शेजारी देश पाकिस्तानचे नाव चौथ्या क्रमांकावर असून पाकिस्तान हा देश प्रत्येक वर्षी 45.6 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन करतो.
Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु
दूध उत्पादनाच्या बाबतीत अमेरिका हा देश देखील कोणाच्या मागे नाही. पहिल्या 5 दूध उत्पादक देशांमध्ये अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेत प्रत्येक वर्षी 98.6 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. या यादीत युरोपियन युनियनचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. येथे प्रत्येक वर्षी 16.73 कोटी टन दुधाचे उत्पादन होते.
Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट
भारताचा कितवा क्रमांक?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. भारतात प्रत्येक वर्षी 18.61 कोटी टन दुधाचे उत्पादन करतो. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला पशुपालन या व्यवसायमध्ये जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागणार आहे. तरच तुम्हाला या व्यवसायाचा फायदा होईल. गाई आणि म्हशींच्या अनेक जाती आहेत. तुम्ही जास्त दूध देणारी जनावरे निवडू शकता.
LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप