Pomegranate Farming

Pomegranate Farming । डाळिंब फुगवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय, मिळेल भरघोस उत्पादन

कृषी सल्ला

Pomegranate Farming । शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून आधुनिक पिकांची लागवड करत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब (Pomegranate) शेती केली जाते. या पिकाकडे भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी देखील या पिकाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. (Pomegranate cultivation)

Devendra Fadnavis । जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

..तर मिळते जास्त उत्पादन

बाजारात डाळिंबाला चांगली मागणी आहे. लागवडीपासून ते तोडणीपर्यंत या पिकाची चांगली काळजी घ्यावी लागते. (Pomegranate cultivation information) या पिकावर मोठ्या प्रमाणात तेल्या रोग पडलेला दिसून येतो. जर याकडे विशेष लक्ष दिले नाही तर खूप मोठे नुकसान होते. डाळिंबाला मागणी ही त्याच्या आकार आणि गुणवत्तेवरून असते. जितके जास्त याचे आकारमान तितकी जास्त याला मागणी असते.

Mahatama Phule Karj Yojana । शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत वाढ, प्रोत्साहन अनुदानाबाबत बैठक पडली लांबणीवर

अनेक शेतकरी चांगले उत्पादन मिळवतात पण त्यांनी पिकवलेल्या डाळिंबाचा आकार आणि गुणवत्ता कमी असते. अशा डाळिंबांना मागणी देखील कमी असते. तुम्ही आता डाळिंब फुगावे यासाठी काही उपाय करू शकता. डाळींबाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत फळाच्या वाढीसाठी आणि रंगाच्या गुणवत्तेसाठी काही उपाय करावे लागतात.

Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार

करा हा उपाय

डाळिंब पिकावर एखाद्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला तर तातडीने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळेत उपाययोजना केल्या पाहिजे. गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन मिळवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट 5 किलोग्रॅम आणि बोरोन 1 किलोग्रॅम प्रति एकराच्या हिशोबाने ठिबकच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळी देणे गरजेचे आहे.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

ऑर्थो सिलिकॉन 3%, 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून एनपीके 0:52:34 हे 5 किलो प्रति एकराला आठवड्यातून एकदा ठिबकच्या माध्यमातून पिकाला पाणी द्यावे. असे केले तर डाळिंबाच्या फुगवणीला मोठी मदत होते. तसेच तुम्हाला जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर चांगल्या जातीच्या डाळिंबाच्या जातीची निवड करावी.

Farmer Success Story । दौंडच्या शेतकऱ्याची कमाल, ऊस शेतीला बगल देत फुलवली शेवंतीची बाग, जाणून घ्या नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *