Eknath Shinde

Eknath Shinde । एकनाथ शिंदेच्या शेतीत कोणकोणती पिके आहेत? जाणून घ्या शेती करण्याची पद्धत

बातम्या

Eknath Shinde । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यामध्ये शेतकरी विविध पिके घेतात. शेती हा भारताच्या अर्थव्यस्थेचा कणा आहे. हल्ली शेतकरी पारंपरिक पिके नाही तर आधुनिक पिके घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे शेती आहे.

Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

“…तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात

नुकतेच ते शेतात काम करताना दिसले. गावातील काही यात्रा तसेच इतर काही कार्यक्रम असल्यास ते आपल्या गावी येत असतात. त्यांनी गाव, शेती, गावाकडील माणसं यांच्यासोबत आपली चांगली नाळ जोडून ठेवली आहे. “मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. ज्यावेळी मी माझ्या जन्मभूमीत येतो, त्यावेळी माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, असे एकनाथ शिंदे म्हणतात.

Pomegranate Farming । डाळिंब फुगवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय, मिळेल भरघोस उत्पादन

‘शेतीत रमत असताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण इतर सर्व बाबी बाजूला राहतात. गाव, शेती, गावाकडच्या माणसांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. जरी कोणताही माणूस गावापासून कितीही दूर गेला आणि कितीही मोठा झाला, तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल, आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा असतोच’.

Devendra Fadnavis । जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

कादांटी खोऱ्यामध्ये नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले जात आहेत. हे खोरे निसर्ग संपन्न असून या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर यासारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला असून आता त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम केले जाईल.

Mahatama Phule Karj Yojana । शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत वाढ, प्रोत्साहन अनुदानाबाबत बैठक पडली लांबणीवर

एकनाथ शिंदे यांच्या शेतात कोणकोणती पिके आहेत?

एकनाथ शिंदे यांच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी, आंबे, औषधी हळद, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे.

Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *