Pest control

Pest control । गोचीड नियंत्रणाविषयी महत्वाची माहिती

पशुसंवर्धन

Pest control । गोचीड हा जनावरांचा शरीरावर आढळणारा व जनावरांच्या रक्ताचे शोषण करणारा अत्यंत त्रासदायक व घातक असा परोपजीवी किड्याचा प्रकार आहे. त्यांच्या अनेक जाती सर्वप्रकारच्या जनावरांना उपद्रव करीत असतात व त्याहीपेक्षा वाईट म्हणजे घातक अशा रोगांचा प्रसार करीत असतात.

गोचिडांबद्दल थोडक्यात पण महत्त्वाचे :

१. गोचिडामध्ये प्रजनन फार वेगाने होत असते. एका नर-मादीच्या जोडीपासून दर तीन आठवड्यांनी ३००० अंडी दिली जातात, तर त्यातील २००० पिल्ले जगतात.

२. जनावरांच्या अंगावर एकूण पैकी फार तर १०% गोचीड दृष्टीस पडतात. उरलेले नव्वद टक्के गोचीड आसपासच्या परिसरात विशेषतः सांदीसपाटीतून असतात. याकरिता फक्त जनावरांच्या अंगावरील गोचिडांचे निर्मूलन करून उपाय होत नाही. एकाच वेळी जनावर व परिसर यामधील गोचिडांवर उपाय करणे गरजेचे असते.

३. गोचीडनिर्मूलनासाठी अनेक औषधे उपयोगी पडतात. परंतू एकाच औषधाचा वापराने गोचिडांना त्या औषधाची सवय होऊन त्याची परिणामकारकता नाहीशी होते, म्हणून दर दोन-तीन महिन्यांनी औषधात बदल करावा लागतो.

४. जनावरांच्या अंगावर व परिसरात किंवा गोठ्यात गोचीडनिर्मूलनासाठी फवारण्याच्या औषधाच्या प्रमाणात फरक असतो. अंगावर मारण्याच्या औषधांपेक्षा गोठ्यासाठी हे प्रमाण दुप्पट करावे लागते. औषधांचा वापर करताना औषध जनावरांच्या नाका-तोंडात जाणार नाही व जनावर चाटणार नाही, याची काळजी घ्यावी. गोचिड निर्मूलनासाठी वापरात येणाऱ्या बऱ्याच औषधांचा अंश दुधात उतरतो व दूध सेवनास अपायकारक होऊ शकते. एक औषध असे आहे की, ज्याची गोचिडांना सवय होत नाही, आणि दुधातही येत नाही. उदा. M & S Industry कंपनीने बनविलेले Permethrin.

५. गोचीडनाशके फक्त पूर्ण वाढ झालेल्या गोचिडांवरच परिणाम करतात. अंड्यावर किंवा लहान अवस्थेतील गोचिडांवर औषध उपयुक्त ठरत नाही. याकरिता गोचिड निर्मूलनाचा कार्यक्रम वारंवार करावा लागतो. गायींमध्ये मुख्यत्वे गोचिडांमुळे तीन अत्यंत घातक रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार होत असतो.

गोचिडांमुळे होणारे रोग

१) बबेसिऑसिस
२) थायलेरियासिस
३)अनाप्लाजमोसिस

हे तीनही रोग रक्तातील लाल पेशींचा नाश करतात व त्यामुळे होणाऱ्या अनिमियामुळे रोगप्रतिकारकशक्ती व जनावरांची ताकद नाहीशी होते. जनावर दगावण्याची स्थिती संभवते. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे कित्येक वेळेस वरील एकाच नव्हे, तर दोन किंवा तीन रोगांचा एकाच वेळी जनावरांस उपद्रव होत असतो. आजारी जनावर चटकन पकडीन न आल्यास व योग्य औषधोपचार न झाल्यास जनावर दगावू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *