Causes and remedies for animal clogging । बऱ्याच वेळा गायी वेळ्यावर जार अडकतो. त्यामुळे पशुपालकांना मोठी चिंता होता. यांनतर डॉक्टरांना बोलून तो जार काढावा लागतो. यामध्ये आपल्या पशूला देखील मोठा त्रास होतो. मात्र वेळेवर जार न पडण्याची संभाव्य कारणे कोणती आहेत. तुम्हाला माहिती आहे का? आज आपण ते पाहणार आहोत.
Jowar Bajar Bhav । ज्वारीचे भाव कडाडले! ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या
१. व्यायच्या वेळी जनावरांची शारिरीक तयारी अथवा अवस्था कमजोर असेल, तर वितानाच्या त्रास सहन न झाल्यामुळे व्याल्यानंतर जनावर आणखी अशक्त होते. त्यामुळे जार बाहेर टाकण्यास गर्भाशयात ताकद राहत नाही.
२. क्षारांची कमतरता असल्यास जार पडण्यास त्रास होतो. उदा. Ca, P, Zn, Se, Vit.E. शरीरामध्ये यांचा तुटवडा असल्यास जार अडकण्याचे प्रमाण वाढते.
३. आहारामध्ये ऊर्जेचे प्रमाण कमी असल्यानेसुध्दा जार अडकू शकते.
४. विताना त्रास होऊन जखमा झाल्यास काही रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे जार बाहेर पडण्यास आडकाठी होते.
५. गरज नसताना वासरू ओढून काढण्याने गर्भदाह होतो.
उपाय : हातांनी कृत्रिमरित्या जार काढण्याची जबरदस्ती व घाई केल्याने जनावरांस परत माजावर येण्यास व गाभण होण्यास मदत होण्याऐवजी त्रासच होतो. परंतु ही पध्दत अज्ञानामुळे अतिशय प्रचलित आहे, पण ही पद्धत गाय वेळेवर गाभण न होणे किंवा दोन वेतांतील अंतर वाढण्यास कारण ठरते.
सुधारणा : हाताने जार काढण्यापेक्षा बाहेर आलेला जार स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने पशुवैद्याकडून कापून टाकल्याने कावळे, कुत्रे इत्यादी आकर्षित होणार नाहीत. जार दोन दिवसांमध्ये अगदी तुकड्यांच्या स्वरूपात पडला तरी त्याचा जनावरांना त्रास होणार नाही, तसेच दूध उत्पादनावर परिणाम होणार नाही हे सिध्द झाले आहे. हाताने जार काढलेल्या गाईपेक्षा औषधोपचाराने उशिरा जार बाहेर पडूनही गायी गाभण लवकर होतात व त्यांना गाभण होण्यास कमी कृत्रिम रेतने लागतात.
Export Ban on Onion । शेतकऱ्यांचे आंदोलन धडकणार दिल्लीत, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक
गाय वित असताना घ्यावयाची काळजी
गाभण गाईस विण्यापूर्वी सात दिवस इतर जनावरांकडून वा माणसांकडून त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. इतर गायींपासून वेगळे करावे. वितेवेळी गाईस बंदिस्त जागेत मोकळी सोडण्याने विण्याची क्रिया नैसर्गिकरित्या होण्यास मदतच होईल. विण्याची लक्षणे दिसताच तिची बसायची जागा कोरडी व स्वच्छ करावी. शक्य असल्यास वाळलेल्या गवताने ती जागा अच्छादित करावी.
Onion Export Ban । कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात; करणार रास्ता रोको
अशा वेळी कावळे व कुत्री फार त्रास देतात. पाणमोठ फुटल्यानंतर ४५ मिनिटे वाट पाहावी. पुढील प्रगती खुंटल्यासारखी वाटल्यास किंवा वासराचे बाहेर आलेले डोके परत मागे जाण्याची भिती वाटल्यास अनुभवी पशुवैद्यकाची मदत घ्यावी, आपल्या आपण जबरदस्ती ओढू नये, अडलेली गाय सोडविण्याचे तंत्र शास्त्रीय माहिती व अनुभवातूनच अवगत होते. ताकद लावण्यासाठी मनुष्यबळ अथवा बैलगाडी, मोटरसायकल, ट्रॅक्टरचा उपयोग करू नये. ही काळजी घेतल्याने गाईला त्रास कमी होऊन दूध उत्पादनात घट येणार नाही. तसेच ही गाय वेळेवर परत गाभण होण्यास मदत होईल.
Havaman Andaj । राज्यात हुडहुडी वाढणार! विदर्भासह ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज