Onion Export Ban

Onion Export Ban । कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात; करणार रास्ता रोको

बातम्या

Onion Export Ban । केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी (Export Ban on Onion) 31 मार्च 2024 पर्यंत केल्याने शेतकरी आणि व्यापारीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे. यामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू शकतो. सरकारने (Government) जर हा निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करू शकतात. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या (Market Committees) बेमुदत बंद ठेवण्यात आल्या आहेत. (Onion Farmers Protest)

Havaman Andaj । राज्यात हुडहुडी वाढणार! विदर्भासह ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज

शरद पवार उतरणार मैदानात

अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे कांद्याप्रश्नी मैदानात उतरले आहेत. उद्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आंदोलन होणार असून या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. (Onion Export Ban Sharad Pawar) त्याशिवाय निर्यात बंदी विरोधात केंद्र सरकारला (Central Govt) जाग आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) करण्यात येत आहे.

Ajit Pawar । कांद्याच्या निर्यातबंदीमुळे दिल्लीत मोठ्या हालचाली, अजित पवार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता

दरम्यान, विंचूर आणि पिंपळगाव बसवंत बाजार समिती सोडून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद होत्या. या दोन्ही बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात लिलाव चालू असताना शेतकऱ्यांच्या रोषामुळे बाजार बंद करण्यात आली आहे. जर सरकारने कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. (Nashik Onion Farmers)

Chinese Garlic । सावधान! तुम्हीही चिनी विषारी लसूण खात नाही ना? अशाप्रकारे तपासा

दिल्लीतील हालचाली वाढल्या

कांदा निर्यात बंदीमुळे दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत कांदानिर्यात बंदीविरोधात पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.

Onion Export Ban | शेतकऱ्यांनो, कांदा विक्रीसाठी नेताय तर ही बातमी वाचा; बाजार समित्या राहणार बेमुदत बंद

बैठकीला अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी उपस्थित राहू शकतात. यादरम्यान, मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे. कांद्याची निर्यात बंदी केल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *