Chinese Garlic

Chinese Garlic । सावधान! तुम्हीही चिनी विषारी लसूण खात नाही ना? अशाप्रकारे तपासा

बातम्या

Chinese Garlic । लसूण (Garlic) दररोज जेवणात वापरला जातो. लसणामुळे जेवणाला चांगली चव येते. महत्त्वाचे म्हणजे जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. आता भारतही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार (India Garlic) सतत वाढत आहे. यामुळे चीनच्या अडचणीत वाढ होत आहे. परंतु, आता चीनच्या लसणाबाबत (Chinese poisonous garlic) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Onion Export Ban | शेतकऱ्यांनो, कांदा विक्रीसाठी नेताय तर ही बातमी वाचा; बाजार समित्या राहणार बेमुदत बंद

बनावट वस्तूंमुळे चीन सतत चर्चेत येत असते. काही चिनी वस्तू खूप धोकादायक असतात. अशात आता चीन विषारी लसूण (Chinese Garlic Risk) तयार करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चिनी लसूण अनेक भारतीय खात आहेत, असा खुलासा झाला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. (Chinese Garlic Risk)

Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली

चिनी विषारी लसूण

नाल्यातील पाण्याचा वापर करुन चिनी लसणाची लागवड (Cultivation of Chinese garlic) करण्यात येत आहे. लीड आणि इतर धातू कणांच्या माध्यमातून लसणाची वाढ जास्त व्हावी यासाठी त्याला अस्वच्छ पाणी देण्यात येत आहे. लसूण (Chinese poisonous garlic) पांढरा दिसावा यासाठी क्लोरीनचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. याच संदर्भात अमेरिकेतील एका खासदाराने चीनमधून लसूण आयात करणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे सरकारकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Soybean Rate । साेयाबीन उत्पादकांवर मोठं संकट! उत्पादन खर्चही निघणं अशक्य

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिका (America) हा चीनमधून लसूण आयात करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक उपभोक्ता देश असून लसणाच्या व्यापारावरुन बऱ्याचवेळा वाद झाले आहेत. अशातच आता सीनेट रिक स्कॉट यांनी लसणाच्या विविध प्रजातींबद्दल सविस्तरपणे माहिती देत असताना या लसणाच्या दर्जासंदर्भात अमेरिकेने सतर्क राहण्याची गरज आहे, असे म्हटलं आहे.

Onion Rate । पाकिस्तानात कांद्याला किती मिळतोय दर? किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

असा ओळखा बनावट लसूण

आता तुम्ही सहज तुमच्या घरात चीनमधील बनावट लसूण आहे की नाही हे तपासून पाहू शकता. बाजारात विकला जाणारा बनावट लसूण हा अधिक पांढरा असून त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतात. लसणाच्या खालील भागावर डाग दिसल्यास हा लसूण चिनी नाही असं समजा. हा लसूण खाली पांढरा असेल तर हा विषारी चिनी लसूण आहे असं समजा.

Marathwada Drought Survey । बिग ब्रेकिंग! ‘या’ तारखेला दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार मराठवाड्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *