Onion Export Ban

Onion Export Ban | शेतकऱ्यांनो, कांदा विक्रीसाठी नेताय तर ही बातमी वाचा; बाजार समित्या राहणार बेमुदत बंद

बातम्या

Onion Export Ban । स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर (Onion Rate) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Govt) कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. यावरून राज्याचे वातावरण पुन्हा एकदा पेटू शकते. ही निर्यात बंदी (Ban Onion Export) 31 मार्च 2024 पर्यंत राहील, याबाबत एक परिपत्रक काढलं आहे.

Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

केंद्र सरकारने या निर्णयापूर्वी ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरानेत कांदा देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे (Heavy rain) खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनावेळी आर्थिक मदतीची अपेक्षा होती, परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

Soybean Rate । साेयाबीन उत्पादकांवर मोठं संकट! उत्पादन खर्चही निघणं अशक्य

अशातच आता कांदा निर्यातबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निर्यातबंदीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद (Market committees in Nashik district) राहणार आहेत. निर्यातबंदीची सूचना कमीत कमी आठ दिवस अगोदर देणे गरजेचे होते. केंद्र शासनाचा निर्णय शेतकरी, व्यापारी यांच्या मुळावर आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Onion Rate । पाकिस्तानात कांद्याला किती मिळतोय दर? किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

कांद्याचे लिलाव बंद

जोपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेतली जात नाही, व्यवहार सुरळीत होत नाही, तोपर्यंत कांदा लिलाव बंद (Onion auction closed) ठेवले जाणार आहेत, असा पवित्रा चांदवड येथील व्यापारी बैठकीत घेण्यात आला आहे. कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात यावे, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत.

Marathwada Drought Survey । बिग ब्रेकिंग! ‘या’ तारखेला दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार मराठवाड्यात

यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काही ठिकाणी तर पावसाने पाठ फिरवली आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, याउलट सरकारने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. शेतकरी आणि व्यापारी सरकारी निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत.

Maha e-Gram Citizen App । आता दाखल्यासाठी जावे लागणार नाही ग्रामपंचायतीत, एकाच क्लिकवर घरबसल्या मिळतील दाखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *