Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात हुडहुडी वाढणार! विदर्भासह ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज

हवामान

Havaman Andaj । डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली तरीही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. मिचाँग चक्रीवादळाने (Cyclone Michong) जनजीवन अक्षरशः उध्वस्त झाले आहे. मुसळधार पावसाने (Heavy Rain in Maharashtra) शेतीची खूप नासाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा (IMD Alert) इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडत असाल तर हवामान अंदाज (IMD Update) जाणून घ्या.

Ajit Pawar । कांद्याच्या निर्यातबंदीमुळे दिल्लीत मोठ्या हालचाली, अजित पवार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता

हवामान खात्याचा मतानुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक पाऊस (Rain Update) पडू शकतो. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यात पावसाने थैमान (Rain Update Maharashtra) घातले आहे. राज्यात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच इतर ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. पुणे आणि मुंबईसह राज्यात पुढील 5-6 दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील.

Chinese Garlic । सावधान! तुम्हीही चिनी विषारी लसूण खात नाही ना? अशाप्रकारे तपासा

त्याशिवाय सकाळी आणि रात्री थंडीचा जोर (Cold Weather) वाढेल. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असेल. राज्यात 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम असेल. आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहील. कोकण, विदर्भासह काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असेल. खरीप पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. (Maharashtra Weather)

Onion Export Ban | शेतकऱ्यांनो, कांदा विक्रीसाठी नेताय तर ही बातमी वाचा; बाजार समित्या राहणार बेमुदत बंद

येत्या 24 तासांत ‘या’ ठिकाणी पडणार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच कर्नाटक किनारीपट्ट भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. शिवाय ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात मध्यम ते दाट धुके पडतील.

Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली

राज्यात पडणार कडाक्याची थंडी

तसेच येत्या काही दिवसात राज्यात कडाक्याची थंडी पडलेली दिसेल. गहू आणि हरभरा या पिकांसाठी हे हवामान अनुकूल राहील. परंतु, थंडीमुळे काही पिकांवर रोग पडू शकतो. राजधानी दिल्लीत देखील तापमान घसरल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा मुंबईच्या हवामानावर जास्त परिणाम पडणार नाही. 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडीचा जोर वाढेल.

Soybean Rate । साेयाबीन उत्पादकांवर मोठं संकट! उत्पादन खर्चही निघणं अशक्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *