Havaman Andaj । देशासह राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून खूप मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाने (Heavy Rain) राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दैना उडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Maharashtra) शेतीचे खूप नुकसान झाले आहे. अनेक पिके जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा
अशातच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान खात्याकडून पुढील 24 तास राज्यात पावसाची (IMD Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्याच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तसेच काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. आज राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Rain Alert) पडू शकतो.
Potato and rice prices । अवकाळी पावसाने पिकांची नासधूस, कांद्यापाठोपाठ बटाटे आणि तांदळाचे भाव वाढले
‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
पुढील 24 तास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरमध्ये पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस पडेल. त्याशिवाय हवामान खात्याने मुंबई आणि पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर उरलेल्या ठिकाणी दिवसभर हवामान ढगाळ राहू शकते.
Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
शेतीसह फळबागांना मोठा फटका
दरम्यान, अवकाळीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले आहे. निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहे. अशातच आता मराठवाडा आणि विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाचा फटका शेतीसह फळबागांना बसला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका यवतमाळ जिल्ह्याला सर्वात जास्त बसला आहे. त्यानंतर बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा फटका बसला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अंदाजानुसार बाधित क्षेत्राचा आकडा वाढू शकतो. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका काही जिल्ह्यांना बसणार असल्याने हवामान खात्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
Success Story । सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल! एकरी घेतले ९७ टन उत्पादन