Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! उद्या राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

हवामान

Havaman Andaj । नोव्हेंबर महिना सुरु होताच तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD Alert) काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची (Maharashtra Rain) शक्यता आहे.

Encroachment On Land । काय आहे खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर

या ठिकाणी पडणार पाऊस

उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात हलक्या पावसाचा (Rain in Maharashtra) अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील. त्यामुळे जर तुमचे महत्त्वाचे काम असेल तर हवामानाचा अंदाज जाणून घेऊनच घरातून बाहेर पडा, असा सल्ला देखील हवामान खात्याने नागरिकांना दिला आहे.

Land Ownership । जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या गोष्टींमुळे बदल होतात? वाचा सविस्तर

हवामान खात्याकडून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. खरीप हंगामातील पीके काढणीला वेग आला आहे. त्यामुळे अनेकांनी पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.

Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी

तसेच ढगाळ वातावरणामुळे उर्वरित राज्यात थंडीचा जोर कमी असणार आहे. दरम्यान, यंदा देशातील काही राज्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. नदी, नाले, धरणांची पाणीपातळी कमी कमी होऊ लागली आहे. कमी पाण्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

Drought in Marathwada । “मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, नाहीतर 10 हजार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू” – रोहित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *