Encroachment On Land

Encroachment On Land । काय आहे खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर

शेती कायदे

Encroachment On Land । सतत जमिनीशी निगडित वाद होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. तुम्ही अनेकदा अतिक्रमण हा शब्द ऐकला असेल. खासगी मालकीच्या जमिनीवर (Land Ownership) अतिक्रमण केल्याची प्रकरणं आपण पाहत असतो. यामुळे वाद निर्माण होतात. अनेकदा हे वाद न मिटल्याने कोर्टाची पायरी चढावी लागते.

Land Ownership । जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या गोष्टींमुळे बदल होतात? वाचा सविस्तर

अतिक्रमण म्हणजे काय?

अतिक्रमण म्हणजे काय? असा पहिला प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर कोणताही कायदेशीर करार न करता जागामालकाच्या किंवा जमीनमालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या भूभागावर ताबा (Land Rule) मिळवणे यालाच अतिक्रमण असे म्हणतात. यात शेतात बांध घालणं, शेतीवर ताबा मिळवणं, दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीतील काही भागात बांधकाम करणे याचा समावेश असतो.

Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी

जाणून घ्या कारणे

  • शेतजमिनीच्या बांधाला खुणा नसल्यास अतिक्रमण करतात.
  • जमिनीचा मालक बाहेरगावी राहत असेल तर अतिक्रमण करतात.
  • जमिनीच्या वाढत चाललेल्या किमतीमुळेही अतिक्रमण केले जाते.
  • प्लॉटला कंपाऊंड नसल्यास अतिक्रमण केले जाते.
  • वारस नसलेलं कुटुंब किंवा गरीब कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण केले जाते.

Drought in Marathwada । “मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, नाहीतर 10 हजार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू” – रोहित पवार

काय असते कायदेशीर प्रक्रिया?

खासगी जमिनीवर अतिक्रमण झाले तर त्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करता येते. परंतु यावर देखील पोलिस यंत्रणा लगेच कारवाई करेल की नाही अशी शक्यता कमी असते. कारण खासगी जमिनीवरील अतिक्रमण ही बाब दिवाणी स्वरुपाची असते. याबाबत तुम्हाला दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. अतिक्रमणाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन नेमून संबंधित भूभागाची किंवा जमिनीची मोजणी होते. त्यावरून अतिक्रमण झाले की नाही हे स्पष्ट होते.

Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा

कोणाला काढता येते अतिक्रमण?

खासगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही संबंधित जमिन मालकाची असते. या अतिक्रमणात शासकीय यंत्रणा, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना दखल घेता येत नाही.

MGNREGA । आता घरबसल्या तपासा तुमच्या गावातील सुरु असणारी मनरेगाची कामे, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *