Jowar Bajar Bhav

Jowar Bajar Bhav । ज्वारीचे भाव कडाडले! ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या

बाजारभाव

Jowar Bajar Bhav । यंदा पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. पावसाअभावी अनेक पिके जळून गेली आहेत. कमी उत्पादनामुळे धान्यांचे दर वाढले आहेत. यात ज्वारीचा (Jowar Price) देखील समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक (Jowar Crop) आहे. येथे ज्वारीचे (Jowar) विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते.

Export Ban on Onion । शेतकऱ्यांचे आंदोलन धडकणार दिल्लीत, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक

ज्वारीला मिळतोय सर्वाधिक दर

ज्वारीचे कोठार असणाऱ्या सोलापूरमध्ये ज्वारीला सर्वाधिक दर (Jowar Price in Solapur) मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत मालदांडी ज्वारीला सर्वात जास्त 5820 रुपये प्रति क्विंटल दर (Jowar Price Hike) मिळाला असून या जिल्ह्यातील करमाळा बाजार समितीत 6051 रुपये प्रति क्विंटल, आणि बार्शी बाजार समितीत ज्वारीला 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Jowar Price Hike in Solapur)

Onion Export Ban । कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात; करणार रास्ता रोको

जाणून घ्या आकडेवारी

आकडेवारीनुसार, सोलापूर बाजार समितीत 2019 च्या डिसेंबर महिन्यात 3500 रुपये प्रति क्विंटल आणि 2020 मधील डिसेंबर महिन्यात याच पातळीवर दर स्थिर होते. 2021 मधील डिसेंबर महिन्यात त्यात घट झाली होती, ते दर 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले. 2022 मधील डिसेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन ते 3800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. 2023 मधील डिसेंबर महिन्यात सोलापूर बाजार समितीतील ज्वारीचे दर सहा हजार रुपयांवर गेले आहेत.

Havaman Andaj । राज्यात हुडहुडी वाढणार! विदर्भासह ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज

सोलापूर बाजार समितीत ज्वारीची कमाल 5820 ते किमान 5800 तर सरासरी 5820 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून मागणीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये अल्प पुरवठा होत असल्याने दरात वाढ झाली आहे. असे असल्याने आगामी काळात शेतकऱ्यांनी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे.

Ajit Pawar । कांद्याच्या निर्यातबंदीमुळे दिल्लीत मोठ्या हालचाली, अजित पवार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता

दरम्यान, ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात सर्वात मोठी वाढ झाली आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे दरगगनाला भिडले आहेत. सरलेल्या मान्सूनमध्ये पावसाने घोर निराशा केल्याने ज्वारीचे दर वाढले आहेत. जर येत्या काळात बाजार समितीत कमी आवक झाली तर दर आणखी वाढू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.

Chinese Garlic । सावधान! तुम्हीही चिनी विषारी लसूण खात नाही ना? अशाप्रकारे तपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *