Signs of identifying mange in animals । आपला दूध व्यवसाय फायदेशीर होण्याकरिता गाईपासून वर्षास एक वासरू मिळविणे फायद्याचे ठरते, जेणेकरून भाकड काळ जास्त राहत नाही व उत्तम नफा मिळतो. यासाठी जनावरांतील माज वेळेवर ओळखणे व योग्य वेळी आपल्या गाय/म्हैशीस कृत्रिम रेतन करून घेणे हे फायद्याचे ठरते. याकरिता नुसत्या निरीक्षणाने गाय/म्हैस माजावर आलेली आहे हे ओळखण्याची महत्त्वाची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात. (Signs of identifying mange in animals)
Jowar Bajar Bhav । ज्वारीचे भाव कडाडले! ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या
- गाय/म्हैस माजावर आल्यास सतत हंबरते, उत्तेजित होते व तिचे खाण्यापिण्यावरील लक्ष उडते.
- जनावर गोठ्यामध्ये शांत रवंथ करीत बसण्याऐवजी जास्त वेळ उभे राहते.
- जनावर शेपूट वर करून उभे राहते व वारंवार लघवी करते.
- दूध उत्पादन तात्पुरते घटते.
- निरण सुजल्यासारखे दिसते.
- योनीमार्ग उघडून आतील भाग पाहिला असता लालसर दिसतो.
- योनीमार्गातून घट्ट काचेसारखा चकचकीत चिकट स्राव लोंबताना दिसतो.
Export Ban on Onion । शेतकऱ्यांचे आंदोलन धडकणार दिल्लीत, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक
गायींमध्ये वरील सर्व लक्षणे हमखास दिसतात, परंतु म्हैशीमध्ये म्हैशींच्या पशुपालकाला खूप बारकाईने लक्ष ठेवावे लागते. म्हैशींमध्ये मुक्या माजाचे प्रमाण जास्त आढळते. जेव्हा रात्री उशीरा व पहाटे सर्व गायी/म्हैशी बसलेल्या असताता, तेव्हा मालकाने /व्यवस्थापकाने गोठ्यामध्ये चक्कर जर मारली तर गायी/म्हशींमधील माज मोठ्याप्रमाणावर ओळखता येईल.
Onion Export Ban । कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात; करणार रास्ता रोको
अजून एक सोपा मार्ग म्हणजे दिवसाकाठी दोन वेळा वळू किंवा पाडा गोठ्यामधून /जनावरांच्या मागून फिरवावा. जनावर माजावर येणार असेल किंवा आलेले असेल, तर वळू लगेच हुडकून काढतो, तो तेथेच घुटमळतो किंवा चढायला बघतो. जर का जनावरे बंदिस्त गोठ्यात नसतील. मोकळी चरण्यासाठी सोडलेली असतील, तर माज ओळखणे सोपे पडते. माजावर आलेले जनावर अस्वस्थपणे हिंडताना दिसते, जास्त वेळ हंबरते.
Havaman Andaj । राज्यात हुडहुडी वाढणार! विदर्भासह ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज
दुसरी जनावरे माजावर आलेल्या जनावराचा योनिमार्ग हुंगतात. माजावर असलेली ही जनावरे दुसऱ्या जनावरांवर चढण्यास बघतात. परंतु आपल्या अंगावर उडू देत नाहीत. माजाच्या काळामध्ये एक अवस्था अशी येते की, माजावर आलेली गाय इतर जनावरे आपल्यावर चढल्यास शांत उभी राहते, हा सुवर्ण समय फक्त दोन तासच टिकतो, हीच वेळ कृत्रिम रेतनास अतिशय योग्य असते. अशावेळी गाय/म्हैस भरवून घेतल्यास गाभण राहण्याचे प्रमाण वाढते.
पशुपालकास ही “सुवर्णसंधी” साधण्याचे कौशल्य जमले पाहिजे. माज बरोबर ओळखून त्यांना वेळेवर कृत्रिम रेतन करवून घेणे यावरती शेतकऱ्यांचे अत्यंत लक्ष असणे गरजेचे आहे, कारण दूधधंदा फायद्याचा होण्यास हाच मूलभूत पाया आहे. कारण जेणेकरून वर्षास एक वासरू मिळवून अधिक दूध उत्पादन मिळविले पाहिजे.