Banana Export । पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेतल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. अनेक शेतकरी आता केळीची लागवड करू लागले आहेत. केळी ही आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने डॉक्टरदेखील रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे वर्षभर केळीला चांगली मागणी असते. तुम्हीही केळीची लागवड (Banana Cultivation) करून चांगले पैसे कमावू शकता.
आता भारतीय केळीची चव नेदरलँडवासीय चाखणार आहेत. कृषी व अन्न प्रक्रियाकृत उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा’च अध्यक्ष अभिषेक देव यांच्या हस्ते बारामतीतुन (Banana in Baramati) केळीच्या पहिला कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला आहे. आयएनआय फर्म्स या कंपनीकडून किमाये ब्रँडअंतर्गत केळीचा (Banana Cultivation Information) पहिला कंटेनर नेदरलँडला पाठवण्यात आला आहे.
Agriculture Technology । युवा शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! स्वतःच बनवला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर
महत्त्वाचे म्हणजे यासाठी डेल मोंटे फूड्स आणि आयएनआय फर्म्स यांच्यात केळी निर्यातीसाठी सामंजस्य करार देखील झाला आहे. त्यानुसार डेल मोंटे फूड्स ही कंपनी केळीची नेदरलँडमध्ये विक्री करणार आहे. यामुळेच देशातील केळी निर्यातीसाठी एक समृद्ध बाजारपेठ मिळाली आहे. साहजिकच याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल.
Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची असेल बक्कळ कमाई तर काळ्या गव्हाची लागवड, मिळतोय ‘एवढा’ दर
या देशात होते निर्यात
भारतात पिकवलेली केळी ही ओमान, सौदी अरेबिया, इराण, उज्बेकिस्तान, इराक, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवैत, बहरीन, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांत पाठवण्यात येते. इतकेच नाही तर आता अमेरिका,चीन, नेदरलँड, रशिया, जपान, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रांस या देशांमध्ये केळी निर्यातीसाठी संधी उपलब्ध झाली आहे.
Ration Card । सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत मिळणार साडी, असा घ्या लाभ