Ration Card । रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डमुळे तुम्हाला फक्त सवलतीत धान्य नाही तर इतर कामांत देखील खूप मदत होते. समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल किंवा तुमचे रेशन कार्डवरचे नाव चुकले असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण
अंत्योदय शिधापत्रिकाधारक असणाऱ्या कुटुंबांना आता फक्त धान्य नाही तर मोफत साडी देखील मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबाला एक साडी मोफत मिळेल. यासाठी सरकारने एक सण निश्चित केला आहे. या सणादिवशी साडीचे वाटप केले जाईल. राज्यातील तब्बल 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय (Antyodaya ration card) कुटुंबाना सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये
सरकारकडून मिळणार पैसे
वस्त्रोद्योग विभागाकडून 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करेल. जाहिरात, प्रसिद्धी, साड्यांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. पुढील पाच वर्षासाठी नागरिकांना सरकारच्या या खास योजनेचा लाभ घेता येणार आहे.