Unseasonal Rain

Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

हवामान

Unseasonal Rain । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वांना दरवर्षी सहन करावा लागतो. मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे चक्र बदलले आहे. मान्सून देशात उशिरा हजेरी लावत आहे परंतु तो अवेळी देखील पडत आहे. सध्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. यात शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. परंतु आता हा पाऊस (Heavy Rain in Maharashtra) अवेळी का पडत आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे.

Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये

या कारणामुळे पडत आहे अवकाळी पाऊस

नोव्हेंबर महिना निम्मा संपत आला आहे. राज्याला थंडीची चाहूल लागली असतानाच राज्यात अवकाळी पाऊस (Rain in Maharashtra) पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील ३ ते ४ दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढत चालला आहे.

Milk Rate । दूध दरावरून रयत क्रांती संघटनेने घेतली आक्रमक भूमिका, विखे-पाटील यांच्या घरासमोर करणार आंदोलन

तसेच अरबी समुद्राच्या वायव्य आणि पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. समुद्राचं बाष्प थेट महाराष्ट्र राज्यावर येत आहे. खास करून दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूला त्याचा प्रभाव जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. भूगर्भातील पाण्याचं आणि समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. ऋतूंच्या सीमारेषा नाहीशा होत चालल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना बसत आहे.

PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होतील ‘इतके’ पैसे

उकाड्याने नागरिक हैराण

सध्या खरीप हंगामातील पीके काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असेही आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरात उकाडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तर ढगाळ वातावरण तयार झाले आहे. समुद्रातील पाण्याचे आणि भूगर्भातील जमिनीच्या बाष्पामुळे असे चित्र पाहायला मिळत आहे.

Havaman Andaj । ऐन थंडीत अवकाळी पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *