Havaman Andaj । राज्यात जरी थंडीची चाहूल लागली असली तरी राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Rain Alert) दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Weather Update)
सध्या खरीप हंगामातील पीके काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असेही आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. येत्या 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आलीय. महाराष्ट्रात आणि गोव्यात शुक्रवारी धनत्रयोदशीला मुसळधार पाऊस पडला आहे. तर आजदेखील 11 नोव्हेंबर रोजी कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Heavy Rain Alert) पडणार आहे.
Post Monsoon Rain । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान
त्याशिवाय आज कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस पडेल. मागील 24 तासात मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे हवामान खात्याचे मत आहे. राज्यावर अवकाळीचं संकट कायम राहील.
Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या
या जिल्ह्यात पावसाचा इशारा
पुढील 24 तासांत मुंबई, पुणे ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडू शकतो. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील अवकाळी पाऊस पडू शकतो.
Rules of Land । शेतजमिनीवर घर बांधतायं? जाणून घ्या नियम नाहीतर पाडावे लागेल घर..