Havaman Andaj

Havaman Andaj । आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ ठिकाणी अवकाळी बरसणार

हवामान

Havaman Andaj । ऐन थंडीच्या दिवसात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची खरीप पिकांची काढणी सुरू आहे मात्र अचानक बारसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर देखील राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुधाळ गाई-म्हशी, शेळी-मेंढी, कुक्कुट पक्षी, वाटप योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान कोकण, सातारा, पुणे या ठिकाणी काही भागांमध्ये काल पाऊस झाला तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

Agriculture Technology । युवा शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! स्वतःच बनवला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर

देशभरात कसे असेल हवामान?

स्कायमेट हवामानानुसार, देशभरात पुढील २४ तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि दक्षिण तामिळनाडूच्या विविध भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम पावसामुळे थंडी वाढू शकते, असा अंदाज आहे.

Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची असेल बक्कळ कमाई तर काळ्या गव्हाची लागवड, मिळतोय ‘एवढा’ दर

कर्नाटकच्या किनारी भागात आज झालेल्या पावसामुळे तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. यासोबतच थंडी आणि धुक्याचा परिणाम आतापासून या भागात दिसून येणार आहे. याशिवाय पुढील पाच दिवस आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये जोरदार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

Ration Card । सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत मिळणार साडी, असा घ्या लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *