Havaman Andaj

Havaman Andaj । महाराष्ट्राच्या ‘या’ भागात आजही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

हवामान

Havaman Andaj । थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाने (Heavy rain) अडचणीत वाढ केली आहे. थंड वाऱ्याने पुन्हा लोकांना थरकाप उडवायला सुरुवात केली आहे. राज्यातील शेतकरी यंदा चांगलाच हवालदिल झाला आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने राज्यातील काही भागांमध्ये पाठ फिरवली. पाऊस वेळेत न पडल्याने पिके जळून गेली. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली.

Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गुरुवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने शेतीचं खूप प्रमाणात नुकसान झालं आहे. (Heavy rain in Maharashtra)

Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन ते तीन दिवस हवामानाची अशीच स्थिती राहील. तसेच शुक्रवार आणि शनिवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या काही भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली.

Lemon Market । लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव

जिल्ह्यातील बाळापूर, वाडेगाव, उरळसह गावाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने काढणीला आलेली खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली आहे. तसेच रब्बी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातही शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.

Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *