Lemon Market । राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. या दिवसात लिंबू (Lemon) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना आहारात लिंबाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. इतर ऋतुंपेक्षा या ऋतूत लिंबाला खूप मागणी (Demand of Lemon) असते. मागणी जास्त असल्याने लिंबाचे दरही (Lemon price) वाढलेले असतात. अशातच आता लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय
किलोला मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव
लिंबाला आता ३० ते ७६ रुपयांचा भाव मिळत (Rate of Lemon) आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात बुधवारी ४९ क्विंटल लिंबाची आवक झाली होती. यावेळी या लिलावात लिंबाला एका किलोला कमाल ३० ते किमान ७६ रुपये भाव मिळाला (Lemon price hike) आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे लिंबू उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Gram Prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती
पूर्ण पिवळ्या आणि कच्च्या हिरव्या रंगाच्या लिंबाला भाव कमी आहे. मध्यम पक्व स्थितीत असणाऱ्या लिंबाला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला आहे, अशी माहिती आडतदार दीपक हिरवे आणि गुलाबभाई बागवान यांनी दिली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच शेतकरी लिंबाच्या मालाची प्रतवारी करत नाहीत. याचाच त्यांना फटका सहन करावा लागतो.
Nutrient Deficiency । सोप्या पद्धतीने ओळखा पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कसे ते जाणून घ्या
लिंबाच्या मालाची प्रतवारी न केल्याने साहजिकच दर कमी मिळतो. पण प्रतवारी केलेल्या लिंबाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे लिंबाच्या मालाची प्रतवारी करावी असा सल्ला अरविंद जगताप यांनी लिंबू उत्पादकांना दिला आहे. दरम्यान, निम्मा फेब्रुवारी संपला असून याच दिवसात लिंबाचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. येत्या काळातही हे दर आणखी वाढू शकतात.
Success Story । आर्थिक तंगीतूनही उभारलं गुऱ्हाळ, गुळविक्रीतून ‘हा’ शेतकरी करतोय लाखोंची कमाई