Cotton Market । काही दिवसांपूर्वी कापसाचे दर कमालीचे घसरले होते. त्यामुळे कापूस (Cotton) उत्पादकांवर मोठे संकट आले होते. कापसाचे दर घसरल्याने (Cotton rate) कापूस उत्पादक शेतकरी कमालीचे नाराज झाले होते. सगळीकडे सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. अशातच आता कापूस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कापसाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्यास (Cotton rate hike) सुरुवात झाली आहे.
Lemon Market । लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव
कापसाचे वाढले दर
अनेक बाजारात कापसाचे भाव क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान वाढले (Increased cotton prices) असून यापुढील काळात कापसाचे भाव (Rate of Cotton) हे कापसाची बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून असणार आहेत, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. जर देशातील बाजारात होणाऱ्या कापसाच्या आवकेचा विचार केल्यास १ लाख ३७ हजार गाठी कापूस विक्रीसाठी आला होता.
Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय
याचाच अर्थ असा की, बाजारातील आवक ७ लाख गाठींनी कमी झाली असून या आवकेत महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ८७ लाख गाठी होता. यात महाराष्ट्रातील बाजारात झालेली आवक सर्वात जास्त होती. महाराष्ट्रातील बाजारात ४७ लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता आणि गुजरातमध्ये ४० लाख गाठी कापसाची विक्री झाली आहे.
Gram Prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती
तसेच देशातील इतर राज्यांमधील आवक ५० हजार गाठींच्या दरम्यान होती, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कापसाची आज क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली होती. कापसाच्या कमाल आणि सरासरी भावपातळीत ही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आजही कापसाचे बहुतांशी बाजारांमध्ये किमान भाव ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळाले आहेत. सरासरी दर ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते.
Nutrient Deficiency । सोप्या पद्धतीने ओळखा पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कसे ते जाणून घ्या
येत्या काळात आणखी वाढणार दर
दरम्यान, देशातील काही बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावही वाढत आहेत. त्यामुळे देशातील कापसाचे दर येत्या काळात आणखी वाढू शकतात. तर येत्या दोन आठवड्यापर्यंत कापूस सरासरी ७ हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Success Story । आर्थिक तंगीतूनही उभारलं गुऱ्हाळ, गुळविक्रीतून ‘हा’ शेतकरी करतोय लाखोंची कमाई