Cotton prices

Cotton prices । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार दर

बाजारभाव

Cotton prices । गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. दर (Cotton Rate) कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता यंदा कापसाला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त दर (Cotton Rate Hike) मिळणार आहेत.

Cow Poisoning । धक्कादायक! विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

राज्यात कापसाचा भाव 7200 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. जो MSP पेक्षा जास्त आहे. दरम्यान, सरकारने 2023-24 साठी मध्यम फायबर कापसाचा MSP 6080 रुपये प्रति क्विंटल वरून 6620 रुपये इतका प्रति क्विंटल केला असून लांब फायबर जातीचा एमएसपी 6380 रुपयांवरून 7020 रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्यामुळे यावर्षी हे दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे.

Satbara Utara । सातबारा देखील असतो बोगस! ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि ओळखा बनावट सातबारा

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने पहिल्या पीक अंदाजात 2023-24 मध्ये कापूस उत्पादन 295.10 लाख गाठी होतील, असे म्हटले आहे. जो मागील 15 वर्षातील सर्वात कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे एका गुठळ्याचे वजन 170 किलो इतके असते. 2023-24 चा अंदाज मागील वर्षीच्या 318.90 लाख गाठींपेक्षा 7.5 टक्क्यांनी कमी आहे. एल निनोचा परिणाम आणि कापूस क्षेत्रात 5.5 टक्के घट झाल्यामुळे उत्पादनात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *