Satbara Utara

Satbara Utara । सातबारा देखील असतो बोगस! ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि ओळखा बनावट सातबारा

शेती कायदे

Satbara Utara । जमिनीवरून सतत काही ना काही वाद होत असतात. अनेकदा हे वाद टोकाला जातात. शेताचा बांध कोरणे, शेतरस्ता यावरून अनेक वाद होतात. जमीन म्हटली की सर्वात अगोदर आपल्या डोळ्यासमोर सातबारा (Land Rule) येतो. सातबारा खूप महत्त्वाचा असतो. परंतु, सातबारा देखील बनावट असतो. त्यामुळे वेळीच त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा फटका बसेल.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

या सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या मालकाविषयी संपूर्ण माहिती असते. त्यामुळे बळीराजासाठी सातबारा खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा खोट्या अर्थात बनावट सातबाऱ्यावर व्यवहार घडवून आणले जातात. त्यामुळे आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की बनावट सातबारा कसा ओळखावा? तर काळजी करू नका, कारण आता तुम्ही सोप्या पद्धतीने बनावट सातबारा ओळखू शकता.

Crop Insurance । शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा

  • सातबारा उताऱ्यावरील ई-महाभूमीचा लोगो आणि एलजीडी कोड

सरकारने सातबारा उताऱ्याच्या संबंधित केलेल्या बदलानुसार उताऱ्यावर गावाचा युनिकोड नमूद केला जातो. सात बारा हा बनावट असेल तर त्याच्यावर हा युनिकोड नसतो. तसेच सरकारने सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा तसेच ई-महाभूमीचा (E-Mahabhumi) लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जर सातबारा उताऱ्यावर इ महाभुमीचा लोगो नसेल तर तो सातबारा बनावट समजावा.

Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार बंद लासलगाव बाजार समिती, नेमकं कारण काय?

  • क्यूआर कोड

तुम्हाला आता सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड (Satbara Utara QR Code) पाहायला मिळेल. तुमच्याकडे असलेल्या सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड नसल्यास तो सातबारा बोगस आहे असे समजा. हा क्यूआर कोड स्कॅन केला तर ओरिजनल सातबारा उतारा दिसतो. क्यूआर कोड स्कॅन करून सातबारा उतारा खरा आहे की बनावट आहे, हे तपासू शकता.

Havaman Andaj । राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

  • तलाठ्याची सही

सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते. समजा उताऱ्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा बनावट आहे, असे समजावे. महत्त्वाचे म्हणजे आता सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची डिजिटल सही येते. विशेष म्हणजे ही डिजिटल सही वैध देखील आहे.

Crop Insurance । आधार लिंक नसेल तर तुम्हालाही मिळणार नाही पिकविमा भरपाई, जाणून घ्या महत्त्वाचा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *