Success story

Success story । आर्थिक तंगीतूनही उभारलं गुऱ्हाळ, गुळविक्रीतून ‘हा’ शेतकरी करतोय लाखोंची कमाई

यशोगाथा

Success story । हल्ली शेतकरी शेतीपूरक व्यवसाय (Agribusiness) करू लागले आहेत. ज्यातून त्यांना चांगली कमाई करता येत आहे. व्यवसाय करण्यासाठी जास्त पैसे असावेत असे नाही. तुम्ही कमी पैशात देखील व्यवसाय करून चांगला नफा मिळवू शकता. याचाच प्रत्यय सध्या आला आहे. कमी पैशात एका शेतकऱ्याने गुऱ्हाळ (Gurhal) उभारत लाखोंची कमाई केली आहे.

Bullock Cart Race । ऐकावं ते नवलच! ‘या’ ठिकाणी बैलगाडा शर्यत विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट

कमी पैशात केले काम

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथील शेतकऱ्याने ही किमया केली आहे. रशिद शेख (Rashid Sheikh) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते राजाराय टाकळी गावातील रहिवासी आहेत. ते वयाच्या १६ – १७ व्या वर्षांपासून एका स्थानिक गुऱ्हाळात तब्बल वीस वर्षे काम केले. पण सकाळपासून रात्रीपर्यंत काम करूनही त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या.

PM Surya Ghar Yojana । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येक महिन्याला मोफत मिळणार 300 युनिट वीज

सुरु केले गुऱ्हाळ

त्यामुळे त्यांनी तिथली नोकरी सोडली. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून ते पाण्याचा अंदाज घेत ऊस, मका कपाशी पिकांचे उत्पादन घेत असायचे. पारंपरिक शेतीसह आपल्या घरचा ऊस असल्यानं त्यातून गुळ तयार करून विकला जाऊ शकतो अशी कल्पना त्यांना सुचली. (Income from Gurhal) जवळ असणारे थोडेसे पैसे व्यवसायात गुंतवून आपल्या दोन मुलांसोबत त्यांनी गावात छोटेसे गुऱ्हाळ सुरु केले.

Farmers Protest । दिल्लीच्या सीमेवर तणाव वाढला, पोलिसांनी सोडल्या ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या

सुरुवातील त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला. पण आडवळणी गाव असल्याने त्यांना बाजारपेठ हवी तशी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी जागा बदलण्याचे निश्चित केले. शोधाशोध करून परिसरातील काटशेवरी फाटा तालुका खुलताबाद जवळ वीस गुंठे जागा वार्षिक पंचवीस हजार रुपये भाड्याने घेतली. पाच क्विंटल दैनंदिन गुळ उत्पादन करणारे गुऱ्हाळ त्यांनी सुरु केले.

Crop Insurance Scheme । धनंजय मुंडे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

ते नोव्हेंबर ते मे असे सहा महिने शेख गुऱ्हाळ चालवत असून आता त्यांच्या गुऱ्हाळाला पाच वर्ष पूर्ण झाला आहे. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला आहे. दररोज ४.५ टन ऊसाचे गाळप होत असणाऱ्या शेख यांच्या गुऱ्हाळाच्या खर्चात वार्षिक २५ हजार रुपये जागेचे भाडे आहे. ऊस संकलित करणे, भेंडीची झाडे जमा करून वाहतूक करून गुऱ्हाळ पर्यंत पोहचविणे हे काम पाच मजूर बघतात. गुऱ्हाळात तयार होणारा गुळ विक्रीसाठी १,५,१०,२६ या मापाच्या वजनात उपलब्ध असून त्याची ५० रुपये किलोने विक्री होते. द्रावण स्वरूपातील गुळाची काकवी १०० रुपये लिटर प्रमाणे विकण्यात येते.

Havaman Adnaj । महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *