Havaman Andaj

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस! काही पिकांना फटका तर काही पिकांना फायदा

हवामान

Havaman Andaj । सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडूमध्ये असलेल्या वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टी जवळ आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. (Rain Update )

Banana Export । बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा! नेदरलँडवासीय चाखणार केळीची चव, पहिला कंटेनर रवाना

अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान?

सध्या बरसत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगली चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची खरीप पिकांची काढणी सुरू आहे. ऐन खरीप पिकाच्या काढणीतच अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कोल्हापूर सह सातारा, सांगली, कराड या भागामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे काही अंशी पिकांना याचा फायदा देखील झाला आहे. मात्र हाताशी आलेली पिके देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Animal Fodder । शेतकऱ्यांना मिळत आहे कमी किमतीत जनावरांसाठी हिरवा चारा, जाणून घ्या ऑर्डर कशी करावी

आपण जर कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये देखील अवकाळी पाऊस होत आहे. मात्र या ठिकाणी ऊस क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे ऊस पिकाला या पावसाचा मोठा फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पूर्वेचा भाग तसेच पश्चिम घाट परिसरात पाऊस झाला आहे. हा पाऊस पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे. भात पिकासाठी देखील हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सरकार सोडणार तुमच्या खात्यावर पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *