Havaman Andaj । सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस कोसळताना दिसत आहे. आज देखील हवामान विभागाने ठाणे, रायगडसह रत्नागिरीला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यसह देशभरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. आज देखील राज्यासह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हावामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
Onion Rate । आज कांद्याला किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, मुंबई उपनगरसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळलेल्या पाहायला मिळतील. त्याचबरोबर आज ठाणे जिल्ह्याला आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अनेक दिवस ओढ दिलेला पाऊस राज्यभर चांगलाच बरसत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला आलेला पाऊस अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नदी नाले कोरडे ठाक होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र आता नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या खरीप पीक पावसामुळे वाया गेले असले तरी रब्बी पिकाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Tractor New Update । ‘या’ कारणामुळे वाढत आहे दिवसेंदिवस ट्रॅक्टरची मागणी! जाणून घ्या सविस्तर..
मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण
मान्सून पश्चिमेकडे सरकत असल्याने राज्यभर चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे देखील पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान मधून पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून पूर्णपणे माघारी फिरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.