Alu Cultivation

Alu Cultivation । शेतकरी मित्रांनो अळूची लागवड करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत; जाणून घ्या लागवडीबद्दल कृषी तज्ञांची मोठी माहिती

कृषी सल्ला

Alu Cultivation । जर पाण्याची सोय असली की वर्षभर तुम्हाला अळूचे (Alu) उत्पादन घेता येते. जर तुम्ही अळूच्या लागवडीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन निघते. तुम्ही भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. या पिकांवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Onion Crop Management । कांद्यावरील सर्वात घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे करा नियोजन नाहीतर होईल मोठे नुकसान

अळू या पिकाची लागवड केली तर कृषी तज्ञ खरीप हंगामामध्ये करण्याचा सल्ला देतात. खरीप हंगामात अर्थातच जून महिन्यात याची लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळते. लागवडीसाठी योग्य जातींची लागवड करण्याचा सल्ला देण्यात येतो. लागवड केल्यानंतर योग्य पीक व्यवस्थापन करावे लागते. लागवड करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

Success Story । काकडीच्या लागवडीतून शेतकरी श्रीमंत, एक एकर काकडीतून मिळाले दोन लाख रुपये

जमिन

अळूची लागवड सेंद्रिय पदार्थांनी युक्त असणारी जमिन लागते. लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकाराची जमीन निवडा. ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत असल्यास अशीच जमीन उपयुक्त ठरते. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून घ्या. शेणखत टाकून तीन फुट अंतरावर सरी-वरंबे काढावेत. लागवड करताना सरीमध्ये 90 सेंटीमीटर अंतर ठेवून कंद लावावे.

Soybean rates । सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त, हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन केले आंदोलन

या वाणांची करा निवड

जर तुम्ही कोकण हरितपर्णी, श्री किरण, श्री रश्मी, श्री पल्लवी, पंचमुखी आणि सातमुखी या अळूच्या सुधारित वाणांची लागवड केली तर जास्त उत्पादन मिळते. शिवाय या पिकाचे कंद लावले जातात. कंद लागवड केल्यानंतर ताबडतोब मातीने झाकून द्यावे. विशेष म्हणजे कंदाची लागवड पूर्ण झाल्यास लगेचच पाणी देणे आवश्यक असते.

Milk Subsidy । मोठी बातमी! अखेर दूध अनुदानाचा शासन जीआर आला, ‘या’ असतील अटी; वाचा संपूर्ण माहिती

कृषी तज्ञांच्या माहितीनुसार अळूचे पीक जर कंदासाठी लावल्यास लागवडीनंतर सहा महिन्यांनी हे पीक काढण्यासाठी तयार होते. जर पानांच्या उत्पादनासाठी या पिकाची लागवड केल्यास अडीच ते तीन महिन्यात हे पीक काढणीसाठी तयार होते. तुम्ही पहिल्यांदा पाने काढता त्यानंतर १५ दिवसात दुसऱ्या वेळी पाने काढायला येतात.

Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *