White Strawberries

White Strawberries । शेतकऱ्याची बातच न्यारी! लाल नाहीतर पांढऱ्या स्ट्रॉबेरीची केली शेती; लाखोंचे उत्पन्न

यशोगाथा

White Strawberries । सध्याचे शेतकरी हे शेतात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळी पीके घेत असतात. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. महाराष्ट्रातील काही शेतकरी स्ट्रॉबेरीची देखील लागवड करतात. आता स्ट्रॉबेरी म्हटलं की तुम्हाला चवीला गोड किंचित आंबट असणारी आवडते. स्ट्रॉबेरी लाल रंगाची असते. मात्र महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने अनोखी पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.

Sugarcane Cultivation । AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, शेतकऱ्यांना मिळणार अनेक मोठ्या समस्यांवर काही मिनिटांत उपाय

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, भिलार आणि वाई या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. थंड हवेचे हे ठिकाण असल्याने या ठिकाणी शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. आता सातारा येथील वाईच्या फुलेनगरात राहणाऱ्या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

Animal Husbandry । जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत रोग कसा होतो? वाचा महत्वाची माहिती

उमेश खामकर असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने अर्धा एकरामध्ये पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. त्यांची स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी देखील सुरू झाली आहे. लवकरच या अनोख्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची ऑनलाईन देखील विक्री केली जाणार आहे. या स्ट्रॉबेरीच्या वैशिष्ट्यांबद्दल पाहिले तर याची किंमत 1000 पासून ते 1500 रुपये किलो पर्यंत आहे. या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सहा पट जास्त असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.

wheat crop । गहू पिकासाठी झिंक अत्यंत आवश्यक, जमिनीत त्याची कमतरता असल्यास हे उपाय करा; उत्पादनात होईल वाढ

आपल्याकडे सहसा शेतकरी लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीची लागवड करतात. मात्र या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचा पहिला प्रयोग अमेरिका आणि इंग्लंड या ठिकाणी झाला होता. या स्ट्रॉबेरीचे नाव फ्लोरिडा पर्ल असे आहे. भारतामध्ये या जातीची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच लावण्यात आली आहे. भारतामध्ये पांढरी स्ट्रॉबेरी टिकवण्याचा पहिला मान शेतकरी उमेश खामकर यांच्या नावावर जमा झाला आहे. त्यामुळे सध्या त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Swabhimani Shetkari Sangathan । धक्कादायक! स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाचा तुफान राडा, चार ते पाच जणांना गंभीर दुखापत

पांढऱ्या स्ट्रॉबेरीच्या चवीबद्दल आपण पाहिले तर लाल स्ट्रॉबेरीच्या तुलनेत पांढरी स्ट्रॉबेरी जास्त गोड आहे. स्ट्रॉबेरी पोषक तत्त्वांमुळे शरीराला चांगली असते. पांढऱ्या स्ट्रॉबेरीला परदेशात देखील खूप पसंत केले जाते. भारतात देखील स्ट्रॉबेरीला चांगले मार्केट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *