Success Story

Success Story । नोकरी नाही तर फुलशेती करून उच्च शिक्षित तरुणाने कमावलं लाखो रुपये, असं केलं नियोजन

यशोगाथा

Success Story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित तरुण नोकरी न करता शेतीत (Agriculture) विविध प्रयोग करत आहे. अशाच एका तरुणाने फुलशेतीतुतन (Floriculture) आपले नशीब आजमावले आहे. यात त्याला फायदा खूप झाला आहे. (Floriculture Farming)

Banana Farming । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! आता केळीपासून बनणार बिस्किटे, कसं ते जाणून घ्या

मनोज दिलवाले (Manoj Dilwale) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा कमंगर गावात राहतात. मागील तीन वर्षांपासून ते गुलाबाची (Manoj Dilwale Floriculture Farming) यशस्वी शेती करतात. मनोज यांनी एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून त्यांनी नोकरी न करता शेती (Rose Farming) करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे १० एकर शेती आहे. सुरुवातीला ते त्यात पारंपरिक पिके (Traditional crops) घ्यायचे. परंतु त्यात त्यांना फायदा होत नव्हता.

Farm Pond Subsidy । सावधान! तुमचेही बॅंक खाते आधार संलग्न नसेल तर मिळणार नाही शेततळ्यांचे अनुदान

असे केले नियोजन

त्यामुळे त्यांनी ३ एकरावर गुलाब आणि शेवंतीची लागवड (Cultivation of Shewanti) केली. इतर ३ एकरात फळबाग आणि उरलेल्या २ एकरावर शेततळी खोदली आहेत. त्यांनी गुलाब लागवडीसाठी शिर्डी या गुलाबाच्या जातीची (Rose varieties) निवड केली. सध्या त्यांच्याकडे २२०० गुलाबाची झाडे (Rose Crop) असून त्याची ते दिवसातून दोन वेळा तोडणी करतात. गुलाब शेती करत असताना विशिष्ट वेळी तोडणी आणि कळी उमलण्याचा समतोल राखावा लागतो.

MNREGA Job Card । बिग ब्रेकिंग! १० लाखांपेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द, नेमकं कारण काय?

किती मिळतो दर?

गणपती, दसरा आणि दिवाळीच्या काळात ते जास्त कमाई करतात. कारण या दिवसात फुलांना जास्त मागणी असते. झाडांपासून ते दररोज जवळपास ३० किलो गुलाबाची तोडणी करतात. याला सरासरी १०० ते १२० रुपये प्रतिकिलोचा दर मिळतो. सणासुदीच्या काळात २०० ते ३०० हाच दर रुपये प्रतिकिलो असतो. छाटणीचे दोन महिने सोडले तर त्यांना दहा महिने गुलाब लागवडीतून फायदा मिळतो.

Ravikant Tupkar । रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच रविकांत तुपकर आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा

दरम्यान, शेतीत कोण काय करू शकेल हे काही सांगता येत नाही. अनेक तरुण आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून आधुनिक पद्धतींच्या पिकांचा प्रयोग करत आहेत. या पिकांना बाजारात चांगली मागणी असते. मागणी जास्त असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु करते.

Dense Fog । सावधान! देशातील अनेक राज्यांमध्ये आज धुके पडणार, या ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *