Banana Farming

Banana Farming । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! आता केळीपासून बनणार बिस्किटे, कसं ते जाणून घ्या

यशोगाथा

Banana Farming । शेतकरी शेतात प्रचंड मेहनत करून पीक घेतात. काहीवेळा शेतकऱ्यांना अपेक्षित हमीभाव मिळत नाही. अनेकदा तर वाहतूक खर्च देखील निघत नाही. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येते. शेतकरी आता शेतीत भन्नाट प्रयोग (Success story) करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. या पिकांना बाजारात (Market) चांगला हमीभाव मिळत आहे.

Farm Pond Subsidy । सावधान! तुमचेही बॅंक खाते आधार संलग्न नसेल तर मिळणार नाही शेततळ्यांचे अनुदान

केळी उत्पादक जिल्हा (Banana Producing District) म्हणून जळगाव जिल्ह्याची (Jalgaon) ओळख आहे. या जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आगळावेगळा प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने शेतीला व्यवसायाची जोड दिली आहे. या शेतकऱ्याने केळीवर (Banana Production) आजपर्यंत अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. केळीपासून सहा प्रकारची उत्पादने तयार केली असून त्या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे (Biscuits from bananas) बनवण्याचा शोध लावला आहे. इतकेच नाही तर त्यासाठी त्यांना त्याचे पेटंट मिळाले आहे. (Banana Biscuits Patent)

MNREGA Job Card । बिग ब्रेकिंग! १० लाखांपेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द, नेमकं कारण काय?

वकिलाने केला अनोखा प्रयोग

अशोक गाढे (Ashok Ghade) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात राहतात. गाढे हे कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली असून त्यांनी पाच वर्षे प्रॅक्टिस केली. त्यांच्या वडिलांचे 1990 वर्षी निधन झाल्याने त्यांना वकिलीची प्रॅक्टिस सोडावी लागली. त्यामुळे त्यांनी घरची पाच एकर शेती कसायला सुरुवात केली. आजोबा आणि त्यांचे वडील केळीचे उत्पादन घ्यायचे.

Ravikant Tupkar । रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच रविकांत तुपकर आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा

इतर शेतकऱ्यांप्रमाणे तेदेखील केळीची लागवड करतात. अनेकदा त्यांच्या केळीला कमी दर मिळतात. त्यामुळे त्यांनी बाजारात केळी पापड,टॉफी, लाडू आणि आता बिस्किटाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. असे असल्याने अशोक गाढे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केळी उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायामुळे इतरांना रोजगार मिळाला.

Dense Fog । सावधान! देशातील अनेक राज्यांमध्ये आज धुके पडणार, या ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज

होतो प्रचंड फायदा

केळीवर काही प्रक्रिया करत त्यांनी केळीचे चिप्स, कॅंडीज, पापड, केळीचा जाम, चिवडा आणि लाडू यासारखे पदार्थ बनवले. प्रयोग करत असतानाच त्यांनी केळ्यांपासून बिस्किट बनवण्याचा शोध लावला. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून त्यांना केळीच्या बिस्किटांचे पेटंट मिळाले आहे. या सर्व उत्पादनांची ऑनलाईन तसेच फ्रेंचाईजीच्या माध्यमातून विक्री केली जाते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो.

Maharashtra Winter Session 2023 Nagpur । आम्हाला घोषणा नको, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *