MNREGA Job Card । नरेगा जॉब कार्ड (NREGA Job Card) ही केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MNREGA) राबवण्यात येते. यात असुरक्षित कुटुंब ज्यांना स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नाही, विधवा महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे देशातील नागरिकांना उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत मिळावा यासाठी, या योजनेला केंद्र सरकारने (Central Govt Schemes) सुरुवात केली आहे.
Ravikant Tupkar । रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच रविकांत तुपकर आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा
योजनेअंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाने वैयक्तिक कामगार लाभार्थ्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित करून त्यांना कंपोस्ट खड्डे खोदणे, वृक्षलागवड करणे, कृषी क्षेत्राचे दुरुस्ती करणे, विहीर खणणे किंवा दुरुस्त करणे ही कामे करून घेण्यात येतात. ग्रामीण विकास कार्यक्रम महात्मा गांधी रोजगार हमी कायदा २०१५ (Mahatma Gandhi Employment Guarantee Act) नुसार ग्रामीण भागात राबवली जातात. (Job Card)
Dense Fog । सावधान! देशातील अनेक राज्यांमध्ये आज धुके पडणार, या ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज
लाखो जॉब कार्ड रद्द
अशातच आता केंद्र सरकारने लाखो मनरेगा जॉब कार्ड रद्द (MGNREGA job card cancelled) करण्याची मोहीम हाती घेतली असून २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १० लाखापेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द केली आहेत. योजनाचा लाभ घेणाऱ्यांनी फसवणूक केल्याने हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त फसवणूक झाली आहे. २०२१-२२ मध्ये ६७,९३७ आणि २०२२-२३ मध्ये २.९६ लाख बनावट कार्डे रद्द केली आहे.
मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. २०२१-२२ मध्ये ५०,८१७ आणि २०२२-२३ मध्ये १.१४ लाख बनावट कार्ड रद्द केली आहेत. मनरेगाचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत मिळावा, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आधार कार्डशी जॉब कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. यात डेटाबेसमध्ये असणाऱ्या चुकांचे निराकरण होऊन पुन्हा अशी फसवणूक होण्याची शक्यता कमी असेल.
Tomato Rate । अमेरिकेत ‘या’ दराने विकला जातोय टोमॅटो, भाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
करा जॉब कार्डची पडताळणी
- मनरेगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला तुमचा १६ अंकी जॉब कार्ड नंबर टाकून तपासणी करता येईल.
- यासाठी १८००-३४५-२२-४४ हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला असून फोन करून तुम्ही जॉब कार्डची स्थिती जाणून घेऊ शकता.
- तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट देऊन तुमच्या जॉब कार्डची पडताळणी करता येईल.