Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana । आताची सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता

शासकीय योजना

Pm Kisan Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना (Government Schemes) आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची (Pm Kisan) सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते जमा झाले आहेत.

Kisan Mandhan Yojana । सरकारची नवीन योजना! दरमहा शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये, असा करा अर्ज

त्यामुळे शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 14 वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सीडिंग करणे बंधनकारक केले आहे. आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे.

Success Story। शेतकरी दाम्पत्याचा अनोखा प्रयोग! मेहनतीच्या जोरावर रानभाजी लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

या दिवशी खात्यात येणार पैसे

मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान या योजनेचा 15 वा हप्ता हा दिवाळीच्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सर्वजण या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, यात काही शंकाच नाही.

Gadchiroli Farmer News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्यांनी दिला संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा; नेमकं कारण काय?

8900 मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाले पैसे

पीएम किसान योजनेविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी केली नसल्याने ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण 8900 मयत शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होत आहे. एकीकडे पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी धडपड करत आहेत तर दुसरीकडे मयत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षी 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे.

Animal husbandry । कौतुकास्पद! ‘या’ गावातील सर्व महिला पाळतात गाई, महिन्याला कमावताहेत हजारो रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *