Pomegranate Rate

Pomegranate Rate । युवा शेतकऱ्याच्या कष्टाचं झालं सोनं! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर; कमावले लाखो रुपये

बाजारभाव
Pomegranate Rate

Pomegranate Rate । शेतकऱ्याच्या शेतमालाला कधी जास्त उच्चांकीचा दर मिळत आहे. तर कधी खूप कमी दर मिळत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगलीच उच्चांकी गाठली होती. मात्र सध्या टोमॅटोला कवडीमोल दर मिळत आहे. दरम्यान आता डाळिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. डाळिंबाला चांगला उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी लाखो ते करोडो रुपये कमवत असल्याची माहिती समोर येत आहे.

Pm Kisan Yojana । आताची सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता

सध्या देखील पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील युवा शेतकऱ्यांने डाळिंब शेतीतून चांगले पैसे कमावले आहेत. या शेतकऱ्याने आपल्या शेतात विविध प्रकारच्या डाळिंबाची बाग फुलवली आहे. रमेश गाडेकर असे या शेतकऱ्याचे नाव असून हा शेतकरी बुधवारी सकाळी आपले डाळिंब शिर्डी जवळ राहता या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन गेला होता. यावेळी त्या शेतकऱ्याच्या डाळिंबाला खर्च जाऊन प्रति किलो ८०० रुपयांचा दर मिळाला आहे. यामुळे या शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Kisan Mandhan Yojana । सरकारची नवीन योजना! दरमहा शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये, असा करा अर्ज

राहाता मार्केटमध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब विक्रीसाठी घेऊन येत असतात. मागच्या तीन वर्षापासून रमेश गाडेकर हे देखील या ठिकाणी डाळिंब विक्रीला घेऊन जातात. त्यांच्या डाळिंबाची सुपीरियर कॉलिटी होती त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या डाळिंबाला २६ किलोच्या कॅरेटला 16,000 रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे.

Success Story। शेतकरी दाम्पत्याचा अनोखा प्रयोग! मेहनतीच्या जोरावर रानभाजी लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *