Success Story। शेतकरी सातत्याने शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. अनेकजण तरकारी पिकांचे उत्पादन घेतात. ठराविक दिवसातच भाज्यांना भाव नसतो. परंतु इतर कालावधीत भाज्यांना चांगली मागणी असते. सध्या तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने भाज्या महाग झाल्या आहेत. दरम्यान, एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे. (Farmer Success Story)
अकोला जिल्ह्यातील धानोरा या गावातील श्रीकृष्ण लांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता लांडे या शेतकरी दांपत्याने करटोल्याची लागवड (Cultivation of Curtola) केली आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि युट्युब, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेत आधुनिक पद्धतीने पिकाची लागवड (Curtola Cultivation Information) त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Animal husbandry । कौतुकास्पद! ‘या’ गावातील सर्व महिला पाळतात गाई, महिन्याला कमावताहेत हजारो रुपये
लांडे यांच्याकडे एकूण पाच एकर शेती आहे . त्यात ते अनेक वर्षांपासून वेगवेगळी पारंपारिक पिके घेत आहेत. परंतु, त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी आपल्या पाच गुंठ्या शेतामध्ये करटोल्याची लागवड केली. आता त्यांनी हे क्षेत्र दहा गुंठ्यापर्यंत वाढवले आहे.
Soil testing । भारीच की! पोस्टाने परीक्षणासाठी पाठवता येणार माती, आठवड्यात मिळेल अहवाल
असे केले नियोजन
करटोल्याच्या लागवडीसाठी त्यांनी अगोदर 40 फूट अंतरावर सिमेंटचे खांब गाडले, त्यासाठी त्यांना वीस हजार रुपये खर्च करावे लागले.16 हजार रुपये किलो दराने जालन्यातून दोन किलो करटोल्याचे बियाणे आणले. मे महिन्यात याची लागवड करून जून महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली. त्यांना पहिल्या तोड्यात 25 ते 30 किलो उत्पादन मिळाले.
Lemon Market । शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण! लिंबांचे वाढले भाव, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर
किती मिळाला दर?
पहिल्या तोड्यावेळी भाव 250 ते 300 रुपये प्रति किलो होता. दोन महिने कालावधी असणाऱ्या पिकातून त्यांना 240 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळाले. सध्या त्यांना दोनशे रुपये किलो पर्यंत दर मिळत आहे. घरच्या घरीच ते तोडणी करतात त्यामुळे त्यांना मजुरीसाठी कोणता खर्च आला नाही. तसेच त्यांना दहा गुंठ्यासाठी 60 हजार रुपये खर्च आला.