Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका (Rain Update) बसला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने थैमान (Heavy rain) घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Maharashtra Weather Update Today)
CIBIL Score । शेतकऱ्यांना सुध्दा कर्जासाठी Cibil Score महत्त्वाचा असतो? जाणून घ्या नियम
जानेवारी महिन्यात संपूर्ण देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडते. परंतु, यंदा मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याची सुरुवात होऊनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्राला (Rain Update in Maharashtra) पुन्हा अवकाळी पावसाचा धोका बसणार असल्याचे सांगतिले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
या ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्यानं उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असणार आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी
उत्तर भारतात थंडीची लाट
तसेच किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये तीव्र थंडीच्या लाटेसोबत दाट धुके पसरले आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट कायम असेल.
Scheme for Wine Industry । वाइन उद्योगास मिळणार प्रोत्साहन, सरकारने सुरु केली खास योजना
येत्या काही दिवसात येथे थंडीचा कडाका आणखी वाढेल. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील 48 तासांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
Success story । तरुण शेतकऱ्यानं कर्ज घेतले आणि सुरु केली स्वत:ची कंपनी, होतेय 3 कोटींची उलाढाल