Urea Price । शेतीसाठी खतांची खूप गरज असते. खतांशिवाय चांगले पीक येऊ शकत नाही. पिकांना जर खतांचे प्रमाण कमी झाले तर पिकांची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात. काही शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु आता शेतकऱ्यांना खतांची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण खतांच्या किमती वाढल्या आहेत.
मिळणार नाही अनुदान
रासायनिक खताला आता केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार नाही. त्यामुळे खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता युरियाच्या दरात वाढ न करता त्याच्या पोत्याचे वजन कमी करून दर पूर्वीसारखा ठेवला आहे. त्यामुळे आता नवीन युरिया ४५ ऐवजी ४० किलो पोत्यातून येणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
Jowar Market । ज्वारीच्या दरात खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर
गगनाला भिडल्या किमती
पूर्वी ५० किलोचे पोते २६६ रुपये ५० पैशांना शेतकऱ्यांना खरेदी करता येत होते, आता त्यात बदल करण्यात आला आहे. ४५ किलो सल्फर कोटेड युरिया ४० किलो केला, तसेच पोत्याच्या वजनाच्या आडून युरियाच्या दरात आतापर्यंत २४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. जरी रासायनिक खते नियंत्रणमुक्त करून त्याचे दर ठरवण्याचे अधिकार खत कंपन्यांना दिले असले तरी खत कंपन्यांची मनमानी सुरू आहे.
Success Story । शेतकऱ्याचा नाद नाही! स्ट्रॉबेरीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न, असं केलं नियोजन
याच कारणामुळे खतांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. दरम्यान, युरियामध्ये ४६ टक्के नत्राचे प्रमाण होते. आता नवीन पॅकिंगमध्ये ३७ टक्के नत्र आणि १७ टक्के सल्फर (गंधक) चे प्रमाण राहणार आहे. हा युरिया पिकांना गरजेनुसार हळूहळू मिळतो. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे, हे जवळपास निश्चितच आहे.
Onion Exprot Ban । धक्कादायक! कांद्यामुळे रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, नेमकं प्रकरण काय?