Onion Harvester । राज्यात दरवर्षी कांद्याची लागवड (Cultivation of Onion) मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कांद्याची खूप चर्चा सुरु आहे. कारण यंदाही कांद्याचे दर (Onion rates) खूप घसरले आहेत. कांदा लागवड करण्यापासून ते कांदा बाजारात विक्रीला नेईपर्यंत त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. शेतकऱ्यांना सर्व कामे मजुरांमार्फत करावी लागतात. पण प्रत्येकवेळी मजूर उपलब्ध होतातच असे नाही.
Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा
कांदा काढणी यंत्र
अनेकदा कामे मजुरांविना अडकून राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहते. पण शेतकऱ्यांची हीच समस्या आता कायमची मिटणार आहे. कारण बाजारात लवकरच कांदा काढणी यंत्र उपलब्ध होणार आहे. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाकडून (Govind Ballabh Pant University of Agriculture and Technology) कांदा काढणीचे एक यंत्र तयार करण्यात आले आहे. (Onion Harvester For Farmers)
Milk Production । सावधान! आता फॅट काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर केली जाणार कारवाई
शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा
या यंत्रामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी येईल. यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना आता कांदा काढणीसह कांदा त्याच्या मुळ्या आणि पातीपासून वेगळा करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे यंत्र आपल्या ट्रॅक्टरला जोडावे लागेल. या मशीनला 15 ते 25 एचपीचा ट्रॅक्टर असावा लागतो. हे यंत्र शेतातील मातीतून कांदा काढते. लवकरच हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.
अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडत आहे की, या यंत्रामुळे कांदा काढताना नासाडी होत असेल. पण याबाबत विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या अनोख्या यंत्राद्वारे कांदा काढणी सुरक्षित होते. शेतकऱ्यांना कांदा काढणीसाठी या मशीनचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट पद्धतीने कांदा लागवड करावी लागणार आहे. असे केले तर कांदा पिकाचे कोणतेही नुकसान होणार नाही.
MGNREGA Budget 2024 । अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा! खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध होत राहणार
दरम्यान, या विद्यापीठाने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांतील शेतकऱ्यांचे काढणीसाठीचे काढणी यंत्र बनवले आहे. २०२० मध्येच विद्यापीठाकडून हे यंत्र तयार करण्यात आले असून, याला लवकरच पेटंट मिळणार आहे. पेटंटची प्रक्रिया पूर्ण होताच ते देशभरातील शेतकऱ्यासांठी उपलब्ध होईल.
Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक धडाकेबाज घोषणा!