Ravikant Tupkar

Ravikant Tupkar । शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

बातम्या

Ravikant Tupkar । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते (Leader of Swabhimani Farmers Association) रविकांत तुपकर हे सतत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतात. शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित अनेक मुद्यांवर, प्रश्नांवर ते आक्रमक भूमिका घेतात. सरकारचे (Government) शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ते मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. अशातच आता रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

रविकांत तुपकर यांनी केलेल्या आंदोलनापैकी काही आंदोलनात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी तुपकरांना एकूण 23 प्रकरणांमध्ये कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अशातच आता रविकांत तुपकरांना मोठा झटका बसला आहे. पोलिसांकडून आता हे जामीन रद्द करण्याची मागणी जिल्हा कोर्टाकडे करण्यात आली आहे.

Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा

सरकारवर केले गंभीर आरोप

आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तुपकरांना पोलिसांनी आता सराईत गुन्हेगार असे म्हटले आहे. यावर आता रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाण्यातून तुपकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बुलढाण्यातून त्यांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकार पोलिसांकडून आपल्याला तुरुंगात डांबण्याचा कट रचत आहे, असा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Milk Production । सावधान! आता फॅट काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर केली जाणार कारवाई

“मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला म्हणून सरकार मला अडचणीत आणत आहे. मला कोणत्याही पद्धतीने तुरुंगात टाकण्याची तयारी सरकार करत आहे, असाही आरोप तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मला तडीपार करून सरकारची माझ्यावर झोपडपट्टी दादा अ‍ॅक्ट लावायची तयारी सुरु आहे. कोणत्याही प्रकारे रविकांत तुपकर हा निवडणुकीच्या मैदानातून बाहेर गेला पाहिजे, यासाठी सरकारकडून वाट्टेल ते प्रयत्न सुरु आहे. माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे”, असाही आरोप तुपकरांनी केला होता.

Cow Farming । काय सांगता! एका वेतात ‘ही’ गाय देते तब्बल 3,000 लिटर दूध, जाणून घ्या या गाईची वैशिष्ट्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *