Go Green Scheme । राज्याच्या काही भागात यंदा पावसाने पाठ फिरवली. याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला. त्यामुळे सध्या विजेची टंचाई सुरु आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. साहजिकच जास्त वापरामुळे वीज बिल जास्त येते. वीज बिल जास्त आल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. परंतु आता तुमच्यासाठी एक अनोखी संधी आहे.
Success Story । भारीच! उच्च शिक्षित बंधूंनी मधमाशी पालन करत केली ४० लाखांची उलाढाल
तुम्ही देखील वीजबिलात सवलत मिळवू शकता. सरकारने ई-ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. त्यात पेपरलेस व्यवहार करण्यावर भर देण्यात येतो. आता यासाठी गो-ग्रीन योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जात आहे. कागदी बिल पाठविणे बंद करून प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत दिली जाते.
Agricultural Tips । घरबसल्या मिनिटात समजेल खत दुकानांमध्ये खत शिल्लक आहे की नाही, फक्त करा ‘हे’ काम
असा घ्या लाभ
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही आता महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेत स्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या वेबसाइटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करू शकता.
Agriculture News । बापरे! किलोला मिळतोय 3 लाखांचा दर, आजच करा ‘या’ पिकाची लागवड
दरम्यान, गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक आहे. त्यामुळे ग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत (Paperless Electricity Bill) गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणमार्फत केले जात आहे. समजा ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज पडली तर त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते.
Krushi Seva Kendra । कृषी सेवा केंद्र सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीच अडचण