Cabinet Decision । सरकार सतत जनतेच्या हितासाठी कल्याणकारी योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा लाभ देशातील करोडो नागरिक घेत असतात. परंतु अनेकांना या योजनांचा (Schemes) लाभ घेता येत नाही कारण त्यांना या योजनांबद्दल माहिती नसते. सरकार महिलांसाठीदेखील योजना राबवत आहे. नुकताच राज्य सरकारने महिलांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव
नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 303 वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिलांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू केला जाईल. 10 टक्के माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना आणि दिव्यांगांना बसस्थानकांवर स्टॉल (Schemes for womens) दिले जाणार आहेत.
मिळेल आर्थिक सक्षमीकरण आणि आरोग्य सेवांमध्ये प्रवेश
तसेच राज्याच्या एकूण बसस्थानकांपैकी 10 टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुग्धजन्य पदार्थ, दूध विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरण आणि आरोग्य सेवांमध्ये प्रवेश मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोणाला मिळणार लाभ?
- माजी सैनिकांच्या विधवा पत्नी
- दिव्यांग
- महिला बचत गट
Milk Rate | दूध दराबाबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक! नेमका काय झाला निर्णय?
जाणून घ्या फायदे
- आरोग्य सेवांमध्ये प्रवेश
- महिला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होतील
- माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना आर्थिक मदत
- महिलांना आर्थिक सक्षमीकरण
या योजनाही आहेत फायदेशीर
सरकारच्या लेक लाडकी योजना, माता सुरक्षित योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50% सवलत, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यांसारख्या योजना आहेत. ज्याचा लाभ देशातील लाखो महिला घेत आहेत.