Lucky Cow

Lucky Cow । काय सांगता? एका गायीने बदलले कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या

यशोगाथा

Lucky Cow । देशात गायीची पूजा करतात. गायीला आईसमान मानले जाते. सध्या अनेक जातींच्या गाई बाजारात उपलब्ध आहेत. काही जातीच्या गाई सर्वात जास्त दूध देतात. शेतीसोबत अनेकजण पशुपालन करतात. यामुळे अनेकांचे नशीब बदलते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका गायीने कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब बदलले (Success story) आहे. जाणून तुम्हालाही नवल वाटले असेल ना. कसा झाला चमत्कार? जाणून घेऊयात.

Crop Insurance । सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातही मिळणार १ रुपयात पीक विमा

हा चमत्कार हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील तोशाम शहरातील हरिपूर गावातील असून गावचे रहिवासी असणाऱ्या ऋतिक या शेतकऱ्याकडे ही गाय आहे, या गायीमुळे त्यांच्या कुटुंबाचे नशीब बदलले आहे. याबाबत शेतकऱ्याने माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा वडील रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब कर्जाच्या जाळयात सापडले होते. त्यांच्याकडे एक म्हैस घेण्याइतपतही पैसे नव्हते. त्यामुळे हृतिक यांनी शेजारच्या गोठ्यातून एक असहाय्य गाय आणून तिचे संगोपन केले. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी ही गाय भाग्यवान ठरली.

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

खासगी पशुवैद्य म्हणून काम

घरी गाय आणल्यानंतर ते खासगी पशुवैद्य म्हणून काम करू लागले. काम सुरळीत चालू झाल्यानंतर त्यांनी एका खासगी शाळेत भागीदारी केली. त्यांच्या बहिणीला सरकारी शिक्षिकेची नोकरी मिळाली. आज हृतिक यांच्याकडे चांगले घर, कार, चांगला व्यवसाय आहे. घरात इतका आनंद एका गायीमुळे आला आहे

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

ही गाय दिवसाला एकूण १८-२० लिटर दूध देते. ते या गायीला गहू आणि बाजरी लापशी खाण्यास देतात. त्याशिवाय ही गाय सफरचंद आणि गाजर खायला देतात. या गायीची किंमत चार लाख रुपये आहे. परंतु जरी ती कोणी करोडो रुपयांना मागितली तरी ती मी विकणार नाही, असे या शेतकऱ्याने सांगितले.

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

गाय पाहण्यास गर्दी

या गायीची चर्चा परिसरातच नाही तर आजूबाजूच्या गावात आहे. या गायीला पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. गाय पाहण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याने असे सांगितले की, या गायीबद्दल खूप चर्चा ऐकली होती. ही गाय भाग्यवान असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि शांत देखील आहे. देशी गाय असून ती १८ ते २० किलो दूध देते, ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *