Export Of Fruits And Vegetables । शेतकरी विविध भाज्यांसह आंबा, डाळिंब आणि फणस यांसारख्या फळांची देखील लागवड करतात. फळे आणि भाज्या नाशवंत स्वरूपाच्या असतात. त्या जास्त वेळ टिकत नाहीत. काही काळाने त्या खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर
मागील काही दिवसांपासून सरकार सागरी मार्गाने (Sea route) केळी, आंबा, डाळिंब आणि जॅकफ्रूट यांसारख्या विविध फळे (Export Of Fruits) आणि भाज्यांच्या निर्यातीला (Export Of Vegetables) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोटोकॉल तयार करत होते. बहुतांश वस्तू कमी प्रमाणात आणि विविध पिकण्याच्या कालावधीमुळे हवाई मार्गाने निर्यात (Export by sea) करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना आता सागरी मार्गाने फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात करता येणार आहे.
Pune Buffelo farming । पुण्यातील सर्वात मोठा म्हशीचा गोठा, दररोज ३०० लिटर दुध होत संकलित
याबाबत एका वरिष्ठ अधिकार्यानी माहिती दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, “सध्या बहुतांश वस्तू कमी प्रमाणात आणि विविध पिकण्याच्या कालावधीमुळे हवाई मार्गाने निर्यात करण्यात येत असून लवकरच आता या वस्तू सागरी मार्गाने निर्यात केल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या आणि फळे खराब होणार नाही. आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार नाही.
Cabinet Decision । महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या..
असणार नियम
या प्रोटोकॉलमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने या मालाची पिकवण्याची पद्धत समजून घेणे, प्रवासाची वेळ समजून घेणे, विशिष्ट वेळी कापणी करणे आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे. विविध फळे आणि भाज्यांसाठी हे नियम वेगळे असतील, हे लक्षात ठेवा. प्रमाण आणि किंमत हे सागरी मार्गाने निर्यात करण्याचे दोन फायदे आहेत.
Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव
शेतकऱ्यांना होणार फायदा
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला चालना मिळेल. हवाई मालवाहतूक निर्यातीचा या वस्तूंच्या किंमतीच्या स्पर्धात्मकतेवर देखील चांगला परिणाम दिसून येईल. सागरी मार्गाने निर्यात केल्याने फळे आणि भाज्या खराब होणार नाहीत. शिवाय खर्च देखील कमी होईल. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.