Farmer March । निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळ (Drought) तर काही भागात अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच केंद्रीय पथकाने राज्यात नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. परंतु, पाहणी करूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शिवाय शेतमालाचेही दर पडले आहेत.
Havaman Andaj । मोठी बातमी! राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
शेतकरी आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन शेतकरी आक्रोश मोर्चाला (Farmer March in Pune) प्रारंभ होणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात जाहीर सभा देखील पार पडणार आहे. त्यानंतर मोर्चाची सुरुवात होणार आहे. (Mahavikas Aghadi Farmer March in Pune)
Leopards Attack । ऊसतोड कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर, बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलं होत. किल्ले शिवनेरीवरुन शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यत पोहचवण्यासाठी मोर्चा निघणार आहे. किल्ले शिवनेरीवरुन निघणारा हा मोर्चा ओतुर, कळंब, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर असा निघणार आहे. याचे संध्याकाळी चाकण औद्योगिक नगरीत मशाल मोर्चात रुपांतर होईल.
Crab farming । खेकड्याची शेती नेमकी कशी करावी? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या A to Z माहिती
असणार ‘या’ मागण्या
ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाईल. कांदा निर्यात बंदी उठवून निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण आखणे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करणे. बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देणे. खासगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे आणि पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई देणे, या मोर्चात महत्त्वाच्या मागण्या असणार आहेत.
शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित यावेळी उपस्थित राहतील. २७ ते ३० डिसेंबर दरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. याकडे आता सरकार गांभीर्याने पाहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.